Australia tour of Sri Lanka: श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला (SL vs AUS) सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. श्रीलंका- ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर (R.Premadasa Stadium) तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात निसांका (Pathum Nissanka) आणि  कुशल मेंडिसच्या (Kusal Mendis) धमाकेदार खेळीच्या जोरावर  श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेनं जोरदार कमबॅक केलं. या मालिकेत श्रीलंकेचा संघ 2-1 नं आघाडीवर आहे. 


नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथण फलंदाजीचा निर्णय
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. मात्र अव्वल आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या छोट्या खेळीनं ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. कर्णधार आरोन फिंचनं 62 धावांची खेळी खेळली. तर ट्रॅव्हिस हेडनं 70 आणि यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीनं 49 धावा केल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियानं 50 षटकात सहा विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 292 धावांचं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेकडून जेफ्री वँडरसेनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 


निसांका- कुशल मेंडिसची धमाकेदार खेळी
दरम्यान, ऑस्ट्रेलियानं दिलेलं 292 धावांचं लक्ष्य श्रीलंकेनं अगदी सहज पार केलं. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ दडपणाखाली असल्याचं जाणवलं नाही. श्रीलंकेची पहिली विकेट 42 धावांवर पडली. मात्र त्यानंतर निसांका आणि मेंडिस यांनी 170 धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. कुशल मेंडिस 87 धावा करून सामन्यातून निवृत्त झाला. दुसरीकडे निसांकानं 137 धावांची खेळी करत श्रीलंकेला विजयाच्या अगदी जवळ आणलं. अखेर श्रीलंकेनं 4 विकेट्स गमावून आणि 9 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठलं.निशांकाला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आलं.


हे देखील वाचा-