India vs England : एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यासाठी भारतीय संघ याआधीच इंग्लंडमध्ये पोहचलाय. आता मुख्य कोच राहुल द्रविडसह (Rahul Dravid) विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधातील मालिका संपल्यानंतर राहुल द्रविडसह उर्वरित खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तनासुर,  दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागी बीसीसीआय मंयक अग्रवालला संघात स्थान देण्याचा विचार करत आहे. 

सराव सामना - 
रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह सिनिअर खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये पोहचले आहेत. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, जसप्रीत बुमराह, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा. मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि केएस भारत आणि कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडला गेले आहेत. आता उर्वरित खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळणार आहे. मायदेशात झालेल्या टी 20 मालिकेत ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.  

एक ते पाच जुलै दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकमेव कसोटी सामना होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-

सामना तारिख ठिकाण
पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाउल
दुसरा टी-20 सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा टी-20 सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज

इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक- 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै मँचेस्टर 

भारतीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.