कसोटी क्रिकेटमध्ये संथपणे फलंदाजी करणे हे सामान्य आहे, परंतु त्यादरम्यान एकेरी आणि दुहेरी धावा येत राहतात. पण इंग्लंडच्या क्लब क्रिकेट लीगच्या एका सामन्यात कहरच पाहिला मिळाला. या सामन्यात पिता-पुत्र जोडीने एकूण 208 चेंडू खेळले पण केवळ 4 धावा केल्या. या संथ फलंदाजीमागील कारण जाणून लोक त्याचे कौतुक करत आहेत.


ही जोडी म्हणजे पिता-पुत्र जोडीने 208 चेंडूत 4 धावा केल्या. पिता-पुत्र हे दोघे इंग्लंडच्या डर्बीशायर क्रिकेट लीगमध्ये डार्ले ॲबे क्रिकेट क्लबकडून खेळत आहेत. दरम्यान, संघाचा सामना मिकेलओव्हर संघाशी झाला, ज्यामध्ये वडील इयान बेस्टविक आणि मुलगा थॉमस बेस्टविक या जोडीने संपूर्ण जगाला चकित केले.


संघाने 45 षटकात केल्या 21 धावा 


खरंतर, या सामन्यात मिकेलओव्हरच्या संघाने तिसऱ्या दिवशी 35 षटकांत 271 धावा केल्या होत्या. संघाचा सलामीवीर मॅक्स थॉम्पसनने 128 चेंडूत 186 धावा केल्या होत्या. दुसरीकडे इयान बेस्टविकचा संघ डार्ली ॲबे क्रिकेट क्लबने 45 षटकांत 4 गडी गमावून केवळ 21 धावा केल्या. संघाच्या 6 फलंदाजांपैकी केवळ दोनच फलंदाज खाते उघडू शकले. 






इयानने 137 चेंडूत उघडले खाते 


इयान बेस्टविक आणि थॉमस बेस्टविक या पिता-पुत्र जोडीने कहरच केला. इयानने 137 चेंडूपर्यंत आपले खातेही उघडले नाही. त्याचवेळी त्यांचा मुलगा थॉमसने 71 चेंडूत केवळ चार धावा केल्या होत्या. यामध्ये थॉमसने 70 चेंडू डॉट खेळले. यामुळे संघाने सामना अनिर्णित ठेवला.






संथ खेळीमागील कारण...


सामना संपल्यानंतर इयान बेस्टविकने या संथ खेळाबद्दल सांगितले. 271 धावांचे मोठे लक्ष्य समोर होते. अशा परिस्थितीत आमचा संघ खूपच तरुण असल्याने आणि अनुभवाची कमतरता असल्याने आम्ही सामना जिंकण्यासाठी खेळू शकलो नाही. आम्ही सामना गमावला असता. अशा परिस्थितीत आम्ही दिवसभर खेळायचे ठरवले. आम्ही आमच्या विकेट वाचवू शकतो की नाही ते पाहू. यात आम्ही यशस्वी झालो. आमच्या संघाचा सामना अनिर्णित राहिला.


48 वर्षीय इयान बेस्टविकने सामना संपल्यानंतर बीबीसी रेडिओशी बोलताना सांगितले की, हे जगभर पसरले आहे. त्यात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, कतार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मला जगभरातून फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. सामना ड्रॉ झाल्यावर आमचे खेळाडू ड्रेसिंग रुम मध्ये उड्या मारत होते. स्थानिक क्रिकेट किती चांगलं असू शकतं हे यावरून दिसून येतं. हे एक वर्ल्ड कप जिंकल्यासारखे होते.


हे ही वाचा : 


बांगलादेश मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का! जडेजा अन् सिराज दुलीप ट्रॉफीतून बाहेर, मोठे कारण आले समोर


BCCIने महिला टी-वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा; 'या' खेळाडूच्या हातात धुरा; जाणून घ्या कोणाला मिळाली संधी