Duleep Trophy 2024 Update News : दुलीप ट्रॉफी 2024 चा थरार 5 सप्टेंबरपासून रंगणार आहे. बांगलादेश मालिकेपूर्वीच्या विश्रांतीमुळे या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अनेक प्रमुख भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत, जे कसोटी संघाचा देखील भाग असतील. पण याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 


बीसीसीआयने अशी माहिती दिली आहे की, टीम बी मध्ये समाविष्ट असलेले फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज हे दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत सहभागी होणार नाहीत. या दोघांशिवाय टीम सीचा गोलंदाज उमरान मलिकही बाहेर आहे. सिराजच्या जागी नवदीप सैनी आणि उमरान मलिकच्या जागी गौरव यादवचा समावेश करण्यात आला आहे.


रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज बाहेर


रवींद्र जडेजाला संघातून मुक्त करण्यात आल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धीमाध्यमांमध्ये म्हटले आहे. मात्र, जडेजाला का सुट्टी दिली यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. दुलीप ट्रॉफीमध्ये जडेजाचा संघ ब मध्ये समावेश करण्यात आला होता, ज्याचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आहे. या संघात मोहम्मद सिराजचाही समावेश होता. मात्र, सिराज आजारपणामुळे बाहेर गेला आहे.


रवींद्र जडेजा बऱ्याच दिवसांपासून ब्रेकवर आहे आणि तो शेवटचा टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाकडून खेळला होता. यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी-20मधून निवृत्ती जाहीर केली. जडेजाला श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती. तर मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली. आता या दोन्ही खेळाडूंचे पुनरागमन 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहायला मिळेल.


दुलीप ट्रॉफीसाठी सी आणि सी अपडेटेड टीम :


टीम ब : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन (यष्टीरक्षक)


संघ क : ऋतुराज गायकवाड(कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बाबा इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशु मार्कन, अरमान मार्कन, अरमान (विकेटकीपर), संदीप वॉरियर



हे ही वाचा : 


BCCIने महिला टी-वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा; 'या' खेळाडूच्या हातात धुरा; जाणून घ्या कोणाला मिळाली संधी 

IND vs PAK : तारीख ठरली! 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, ICCने केली टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा