Fastest 50s in T20 World Cups: टी-20 विश्वचषकाच्या 37 व्या सामन्यात भारताने स्कॉटलँडच्या (India Vs Scotland) संघाला धूळ चाखलीय. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं घेतलेला निर्णय योग्य ठरला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी स्कॉटलँडच्या संघाला केवळ 85 धावांवरच रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनीही चांगली कामगिरी करून दाखवली. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी केली. ज्यामुळे भारतीय संघाला केवळ 6.3 षटकातच विजय मिळवता आली. या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) सुपरफास्ट अर्धशतक ठोकून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
टी-20 विश्वचषकातील सर्वात वेगवान अर्धशतक करणारे क्रिकेटपटू-
केएल राहुलने आजच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करीत टी-20 विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत समावेश केलाय. या यादीत भारताचा तडाखेबाज फलंदाज आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (12 बॉल 50) अव्वल स्थानावर आहे. तर, दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाज स्टीफन मायबर्ग (17 बॉल 50) दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (18 बॉल 50) तिसऱ्या स्थानी आहे. विश्वचषकात जलद करणारा केएल चौथा खेळाडू ठरला आहे. तर, युवराजनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे.
टी-20 विश्वचषकातील पॉवरप्ले सर्वोच्च धावसंख्या करणारा संघ-
भारताने या विजयासह आणखी एक विक्रमा केलाय. टी-20 विश्वचषकात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाच्या यादीत भारताचा समावेश झालाय. या यादीत नेदरलॅंड अव्वल स्थानी आहे. नेदरलॅंडने आयर्लंडविरुद्ध 2014 च्या विश्वचषकात 91 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा क्रमांक लागतो. इंग्लंडने 2016 मध्ये दक्षिण अफ्रिकाविरुद्ध पॉवर प्लेमध्ये 89 केल्या होत्या. याशिवाय, वेस्ट इंडीजच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केलाय. या सामन्यात वेस्ट इंडीजने 83 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध पॉवर प्लेमध्ये 83 धावा करण्याचा विक्रम केल्या. आता या यादीत भारत पाचव्या क्रमाकांवर पोहचलाय. भारताने आज स्कॉटलँडविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये 82 धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या-