T-20 World Cup 2021: भारत आणि स्कॉटलँड (India Vs Scotland) यांच्यात आज टी-20 विश्वचषकाचा 37 सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) विराट कोहली आणि मार्टिन गप्टिलच्या खास क्लबमध्ये सामील होण्याची मोठी संधी आहे. अफगाणिस्तानविरुद्ध धमाकेदार खेळी खेळणाऱ्या रोहित शर्माने आजच्या सामन्यात 48 धावा केल्यास त्याला टी-20 क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठता येणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गप्टिल या दोघांनीच टी-20 क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 


रोहित शर्माने भारतासाठी आतापर्यंत 114 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 32.43 च्या सरासरीने 2952 धावा केल्या आहेत. यात या फॉरमॅटमध्ये रोहितने 4 शतके झळकावली आहेत. दरम्यान, रोहितने स्कॉटलँडविरुद्ध सामन्यात 48 धावा केल्यास तो टी-20 विश्वचषकात 3000 धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत समावेश करेल. तसेच अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरेल. या यादीत विराट कोहली 3225 धावांसह अव्वल स्थानावर आहे, तर गुप्टिल 3087 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.


भारतासाठी उर्वरित सर्व सामने 'करो या मरो' अशा परिस्थिती खेळावे लागणार आहेत. गट 2 मध्ये असलेल्या पाकिस्तानने सलग चार विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. तर, याच गटातून न्यूझीलंडचा संघही उपांत्य फेरीत धडक देण्याची शक्यता आहे. जर अफगाणिस्तान आणि नामीबियाने न्यूझीलंडला पराभूत केल्यास भारताच्या आशा पल्लवित होऊ शकतात. भारताचे उपांत्य फेरीत प्रवेश करणे कठीण आहे. मात्र, क्रिकेट असा खेळ आहे, ज्यात काहीही घडू शकते. 


संबंधित बातम्या-