Fan Wrote Letter in Blood for Dhoni : जगाच्या कानाकोपऱ्यात 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) चाहते आहेत. धोनीच्या साधेपणाने चाहत्यांचा मनावर वेगळी छाप पाडली आहे. धोनीच्या प्रेमापोटी चाहते काय करतील याचा काही नेम नाही. काही फॅन्सने शरीरवर धोनीचे टॅटूही काढले आहेत. आता तर एका चाहत्याने तर हद्दच पार केली आहे. त्याने चक्क स्वत:च्या रक्ताने धोनीला पत्र लिहिलं आहे. रक्ताने पत्र लिहित या चाहत्याने धोनीकडे एक मागणीही केली आहे. आता धोनी या चाहत्याची मागणी पूर्ण करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


धोनीसाठी रक्ताने लिहिलं पत्र


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याने आता जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही चाहत्यांचं त्याच्यावरील प्रेम काही कमी झालेलं नाही. आता एका चाहत्यामुळे धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका चाहत्याने धोनीला रक्ताने एक पत्र लिहिलं आहे. रक्ताने पत्र लिहित त्याने धोनीला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीच्या चाहत्याचा हा पराक्रम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.


'आय लव्ह यू माही'


प्रेमी युगुलाने रक्ताने एकमेकांसाठी प्रेमपत्रं लिहिल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. पण विजेश कुमार या चाहत्याने धोनीसाठी रक्ताने पत्र लिहिलं आहे. या चाहत्याने माहीला कार्यक्रमासाठी आमंत्रित करायचे आहे.  त्याने पत्रात लिहिलं आहे की, "माही, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला भिलवाडा येथे होणाऱ्या स्पर्धेत यावे लागेल." 


धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशी स्पर्धेचं आयोजन


धोनीचा हा चाहता राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील शाहपुरा येथील रहिवासी आहे. विजेश कुमारने माहीला स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं आमंत्रण पत्र पाठवलं आहे. धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 7 जुलै रोजी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण विजेशने रक्ताने लिहिलं आहे. 


धोनी 7 जुलैला 42 वर्षांचा होईल


7 जुलै रोजी महेंद्र सिंह धोनीचा वाढदिवस असून तो 42 वर्षांचा होईल. विजेश कुमारला धोनीला वाढदिवसानिमित्त खास भेट द्यायची आहे. धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याने भीलवाडा येथे हॅप्पी बर्थडे कपचं आयोजन केलं आहे. त्याने रक्ताने लिहिलेल्या पत्रात धोनीला या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे. या पत्रात त्याने लिहिलं आहे की, “मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तरीही मी एक-एक पैसा वाचवून ही स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेला मी 'हॅपी बर्थडे वर्ल्ड कप' असं नावही दिलं आहे. पाच ठिकाणी एकूण 5 सामने होणार असून या स्पर्धेत 12 संघ सहभागी होणार असून, विजेत्या संघाला 31,000 रुपये रोख रक्कम आणि उपविजेत्या संघाला 16,000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या वेड्या चाहत्याचं पत्र धोनीपर्यंत पोहोचेल का आणि हे पत्र पाहून धोनी काय प्रतिक्रिया देतो, हे पाहावं लागेल.