Nasser Hussain on Ben Stokes : इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन (Nasser Hussain) याने बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) वनडे क्रिकेटमधील निवृत्तीला आयसीसी (ICC) जबाबदार असल्याचा मोठा दावा केला आहे. त्याच्या मते आजकाल क्रिकेटपटूंना इतक जास्त क्रिकेट खेळावं लागतं, ज्यामुळे खेळाडूंवर ताण येत असल्याने त्यांना किमान एका फॉर्मेटमधून निवृत्ती घ्यावी लागते. नासिरने यावेळी असंही म्हटलं आहे की, येत्या काळात अनेकजण अशाप्रकारे एका-एका फॉर्मेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.


नासिरने 'स्काय स्पोर्ट्स'सोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,'ही अत्यंत निराश करणारी बातमी आहे. यावरुन दिसून येतं की सध्या सुरु असलेलं क्रिकेट शेड्यूल किती जास्त व्यस्त आहे. जर ICC अशाचप्रकारे सतत स्पर्धा घेत राहिल्यास देशांचे बोर्ड अधिक सामने खेळवतील, ज्यामुळे खेळाडू मोठ्या प्रमाणात निवृत्ती घेऊ शकतात.' पुढे बोलताना नासिर म्हणाला,'स्टोक्सने अवघ्या 31 व्या वर्षी क्रिकेटच्या एका फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. हे योग्य नाही. आयसीसी अगदी कसंही सामन्यांचं वेळापत्रक लावत असल्याने खेळाडूंवर ताण येत आहे. त्यात कसोटी आणि टी20 क्रिकेटला अधिक पसंती असल्याने एकदिवसीय क्रिकेटची ही अवस्था होत आहे.'


निवृत्ती घेताना काय म्हणाला स्टोक्स?


'मी इंग्लंडसाठी अखेरचा एकदिवसीय सामना मंगळवारी डरहममध्ये खेळणार असून त्यानंतर ही या प्रकारातून निवृत्ती घेणार आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. मी इंग्लंडसाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळलेला प्रत्येक मिनिट मला खूप जवळ आहे. हा एक सुंदर प्रवास होता. पण हा निर्णय घेण्यापेक्षा अवघड मी माझा 100 टक्के सहभाग माझ्या संघाला देऊ शकत नाही हे आहे.  


मागील 11 वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळत असून आता तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणं माझ्यासाठी अवघड होत असून माझं शरीरही या संपूर्ण वेळापत्रकासाठी खास साथ देत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे माझ्याजागी कर्णधार जोस आणि संघाला एक चांगला खेळाडू मिळू शकतो. तसंच या निर्णयानंतर मी कसोटी आणि टी20 क्रिकेटसाठी जास्त चांगल्याप्रकारे संघाला सहकार्य करु शकेन. 


हे देखील वाचा-