AC Milan Extends Zlatan Ibrahimovic's contract: स्टार फुटबॉलपटू ज्लाटान इब्राहिमोविचनं (Zlatan Ibrahimovic) वय म्हणजे फक्त आकडा असल्याचं ठरवलंय. ज्लाटान इब्राहिमोविच हा वयाच्या 41 व्या वर्षानंतरही फुटबॉलच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. इटालियन फुटबॉल क्लब एसी मिलाननं (AC Milan) त्याचा करार आणखी एक वर्षासाठी वाढवलाय. याबाबत क्लबनं सोमवारी माहिती दिली आहे. 


एसी मिलाननं काय म्हटलंय?
एका पत्रकार परिषदेत एसी मिलानं सांगितलं आहे की, "हे सांगताना आनंद होत आहे की, इटालियन फुटबॉल क्लब एसी मिलाननं स्टार फुटबॉलर ज्लाटानचा एक वर्षासाठी म्हणजेच 30 जून 2023 पर्यंत करार वाढवला आहे. हा स्वीडनचा फॉरवर्ड खेळाडू एसी मिलानसाठी त्याची 11 नंबरची जर्सी घालत राहील."


इब्राहिमोविचची जबरदस्त कामगिरी
इब्राहिमोविच हा स्वीडनचा सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे. त्यानं आपल्या देशासाठी 62 गोल केले आहेत. बर्‍याच काळापासून तो त्याच्या राष्ट्रीय संघाचा भाग नाही, परंतु तो युरोपियन फुटबॉलच्या मोठ्या क्लबांपैकी एक असलेल्या एसी मिलानसाठी फुटबॉल खेळतो. इब्राहिमोविच जानेवारी 2020 मध्ये त्याच्या जुन्या क्लबमध्ये परतला. त्याची यूएस मेजर लीग सॉकर क्लब 'एलए गॅलेक्सी' मधून एसी मिलानमध्ये ट्रान्सफर झालं.


इब्राहिमोविच एसी मिलानसाठी किती सामने खेळले?
दुखापतीमुळं इब्राहिमोविच संघर्ष करावा लागला. दुखापतीमुळं त्याला अनेकदा संघातून बाहेर बसावं लागलं होतं. त्यानं जानेवारी 2022 पासून आतापर्यंत एसी मिलानसाठी 78 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 36 गोल केले आहेत. एसी मिलान सध्या सिरी-ए चॅम्पियन आहे. तब्बल 11 वर्षानंतर एसी मिलानला या इटालियन लीगमध्ये खिताब जिंकता आलं.


हे देखील वाचा-