IND vs AUS, Test Team : ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यात फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान बीसीसआयनं (BCCI) निवडलेल्या या संघात मुंबईचा फलंदाज सरफराज खानने (Sarfaraz Khan) याला संधी न मिळाल्याने बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो गेल्या तीन हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 80+ आहे.


सरफराज खानने आतापर्यंत 36 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 52 डावांमध्ये 3380 धावा केल्या आहेत. येथे त्याची फलंदाजीची सरासरी 80.47 आहे. यादरम्यान त्याने एकूण 12 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने एक त्रिशतकही ठोकले आहे. गेल्या तीन हंगामापासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येतच आहेत. त्याने 2019-20 मध्ये 155 च्या सरासरीने 928 धावा केल्या. यानंतर, 2021-22 मध्ये, त्याने पुन्हा एकदा 123 च्या सरासरीने 900 हून अधिक धावा केल्या. 2022-23 च्या मोसमातही तो दमदार खेळी करत आहे


दरम्यान या 25 वर्षीय युवा फलंदाजाची ही अप्रतिम कामगिरी पाहून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, अशी आशा सर्वांना वाटत होती. यापूर्वी असेही बोलले जात होते की, खानला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत नक्कीच संधी मिळेल, पण त्या मालिकेत संधी न मिळालेल्या सरफराजला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही संधी न मिळाल्याने फॅन्स आणि क्रिकेट तज्ज्ञही नाराज झाले आहेत.



















ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमालिकेसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव


हे देखील वाचा