एक्स्प्लोर

England vs India Women: भारतीय संघाची खराब कामगिरी, इंग्लंडकडून आठ विकेटने पराभव

दरम्यान, 17 वर्षीय शफाली ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सर्वात कमी वयात पदार्पण करणारी भारतासाठी पहिल्या, तर विश्वातील पाचव्या क्रमांकाची खेळाडू ठरली आहे.

IND W vs ENG W : ब्रिस्टलमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडने भारतावर आठ विकेट्सनी विजय मिळवला आहे. याबरोबर इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकांमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 50 ओवरमध्ये 201 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने लक्षाचा पाठलाग करताना आठ विकेट्स आणि 91 बॉल राखून विजय मिळवला.

इंग्लंडकडून टॅमी ब्यूमाँट (नाबाद 87) आणि नताली सायव्हर (नाबाद 74) यांनी मॅच विनिंग खेळी केली. या आधी इंग्लंडच्या लॉरेन हिल 16 धावा आणि हीदर नाईटने 18 धावा करुन बाद झाल्या. टॅमी ब्यूमोन्टने 87 धावा करताना 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर नताली सायव्हरने 74 धावांची नाबाद खेळी करताना 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. टॅमी ब्यूमाँट आणि नताली सायव्हर यांनी 119 धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून झूलन गोस्वामी आणि एकता बिष्टने प्रत्येकी एक गडी बाद केला. 

तत्पूर्वी, अनुभवी फलंदाज आणि कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकामुळे भारताला इंग्लंडसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवता आले. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना मितालीने 108 चेंडूत 72 धावांची खेळी साकारत 7 चौकार लावले. तर पूनम राऊतने 32 आणि दीप्ती शर्माने 30 धावा केल्या. याशिवाय पूजा वस्त्राकर आणि शेफाली वर्मा यांनी 15-15 धावांची खेळी केली. अखेरीस भारतीय संघाने 50 षटकांत 8 बाद 201 धावा केल्या.

दरम्यान, 17 वर्षीय शफाली ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सर्वात कमी वयात पदार्पण करणारी भारतासाठी पहिल्या, तर विश्वातील पाचव्या क्रमांकाची खेळाडू ठरली आहे.

दोन्ही संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना 30 जून रोजी टॉन्टनमध्ये खेळला जाईल. जर भारताने दुसरा सामना गमावला तर तीन सामन्यांची मालिका भारताला गमवावी लागेल. 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Shubman Gill: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget