Shami 200th Test Wicket: : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमालीचं प्रदर्शन दाखवलं. सेंच्युरियन मैदानात (Centurion) सुरु असलेल्या या सामन्यात आधी भारताने 327 धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघालाही 197 धावांमध्ये रोखत भारताला 130 धावांची आघाडी मिळवून दिली आहे. यावेळी भारताच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. यावेळी भारताकडून अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohemmed Shami) सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत दोन मान या सामन्यात मिळवले. 


सामन्यात शमीने एका डावात 5 विकेट घेत फाईव्ह विकेट हॉल मिळवला. यासह शमीने कसोटी क्रिकेटमधील 200 विकेटचा टप्पाही पार केला आहे. ही कामगिरी त्याने 55 सामन्यातील 103 डावामध्ये केली आहे. 56 धावा देत 6 विकेट घेणं ही शमीची सर्वोत्तम कामगिरी आहे. शमीने सामन्यात 16 ओव्हरमध्ये 44 धावा देत 5 विकेट घेतल्या. यावेळी त्याने 5 मेडन ओव्हरही टाकल्या आहेत.



आतापर्यंत सामना


आतापर्यंतच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 327 धावा केल्या. यावेळी भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने (KL Rahul) केली. त्याने अप्रतिम शतक झळकावत 123 धावा केल्या. तर मयांक अगरवालने 60 धावा केल्या. या दोघांनंतर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) एका चिवट खेळीचं दर्शन घडवलं असून त्याने 102 चेंडूत 48 धावा केल्या आहेत. पण त्यानंतरचे सर्व फलंदाज बुमराह सोडता दुहेरी संख्याही गाठू शकले नाही. बुमराहने केवळ 14 धावा केल्या. तर ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 8 धावा केल्या आहेत. तर आश्विन, ठाकूर आणि सिराज यांनी 4 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी दबदबा काय ठेवला. पहिल्या षटकात बुमरहाने सलामीवीर एल्गारला एका धावेवर बाद केलं. त्यानंतर पुढील विकेटही लगेच गेले. पण कर्णधार बावुआ आणि डिकॉक यांनी एक चांगली भागिदारी करत धावसंख्या 100 च्या पुढे नेली. पण डिकॉक बाद होताच आणखी विकेट पडू लागले. कर्णधार बवुआही अर्धशतक करुन बाद झाला. त्यानेच सर्वाधिक 52 धावा केल्या. पण संपूर्ण संघ 197 धावाच करु शकल्याने भारताकडे 130 धावांची आघाडी कायम होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताने काहीच ओव्हर खेळल्या पण तितक्यात भारताचा सलामीवीर मयांक 4 धावा करुन बाद झाल्याने दिवसअखेर भारत 146 धावांच्या आघाडीसह 16 वर एक बाद अशा स्थितीत आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha