Ashes 2021: अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडच्या (England)  संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवलीय. ज्यामुळं इंग्लंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्कारावा लागलाय. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघानं मालिकेत 3-0 अशी आघाडी घेत मालिका जिंकलीय. तसेच या मालिकेतील अखेरचे दोन सामने केवळ औपचारिकता म्हणून खेळले जाणार आहे. दरम्यान, इंग्लंडनं मालिका गमावल्यानं माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड (David Lloyd) यांनी संताप व्यक्त केलाय. या पराभवासाठी त्यांनी इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या (Joe Root) चुकीच्या रणनीतीला जबाबदार धरलंय. डेव्हिड लॉयड म्हणाले की, तिसऱ्या सामन्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा इंग्लंडचा संघ चांगल्या स्थितीत होता, पण त्यानंतर जो रूटनं अनेक चुका केल्या, त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय.


डेव्हिड लॉयड काय म्हणाले? 
डेव्हिड लॉयड म्हणाले की, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडचे गोलंदाज चांगली कामगिरी करत होते आणि ऑस्ट्रेलियन संघ दडपणाखाली होता. पण उपाहारानंतर जो रूटनं जॅक लीचकडे चेंडू सोपवला, ज्यानं ऑस्ट्रेलियाचं सर्व दडपण दूर झालं. जॅक लीनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कमबॅक केलं. तिसऱ्या कसोटी सामन्यातही हीच गोष्ट पाहायला मिळाली. ज्यामुळं इंग्लंडच्या हातातून सामना निसटला, असं डेव्हिड लॉयड म्हणाले आहेत.  


मालिका गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटवर चौफेर टीका होत आहे. काहीजण त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर काहीजण पराभवासाठी संघाच्या फलंदाजांना जबाबदार धरत आहेत. अॅडलेड कसोटी गमावल्यानंतर माजी कर्णधार नासेर हुसेन आणि अॅलिस्टर कूक यांनी जो रूटच्या कर्णधारपदाकडं बोट दाखवलं होतं. पहिल्या सामन्यापासून ऑस्ट्रेलिया संघाने चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळंच ऑस्ट्रेलियाने पहिले तीन कसोटी सामने जिंकून ऍशेस मालिका जिंकली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-