ENG vs IND: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर क्रिकेट सामना खेळवला जात आहे. ऋषभ पंत, रवींद्र जडेजाचं शतक आणि बुमराची फलंदाजी या बळावर भारतानं पहिल्या डावात 416 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर इंग्लंडची दुसऱ्या दिवसअखेर पाच विकेट्स गमावून 84 धावा केल्या. हा सामना भारताच्या बाजूनं झुकलेला दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, या मैदानावर पहिल्या डावात 400 हून अधिक धावा करणारा संघ कधीच पराभूत झाला नाही.


दरम्यान, एजबॅस्टन येथे ज्या संघानं प्रथम फलंदाजी करत 400 हून अधिक धावा केल्या तो संघ कधीच पराभूत झालेला नाही. एजबॅस्टन येथे याआधी 16 वेळा पहिल्या डावात 400+ धावा केल्या गेल्या आहेत. पहिल्या डावात 400+ धावा करणाऱ्या संघांनी 8 सामने जिंकले आहेत. तर, 8 सामने अनिर्णित राहिले आहेत. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजूबत स्थितीत आहे. 


आतापर्यंतच्या विक्रमावर एक नजर


- जुलै 1979 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 633 धावा करून सामना जिंकला होता.


- जून 1971 मध्ये पाकिस्ताननं पहिल्या डावात 608 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.


- जुलै 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 594 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.


- जुलै 2004 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 566 धावा करून सामना जिंकला होता.


- जून 1962 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 544 धावा करून सामना जिंकला होता.


- ऑगस्ट 2017 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 514 धावा करून सामना जिंकला होता.


- जून 1998 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 462 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.


- जून 1992 मध्ये पाकिस्ताननं पहिल्या डावात 446 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.


- जुलै 1987 मध्ये पाकिस्ताननं पहिल्या डावात 439 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत ठरला.


- जून 1984 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 438 धावा करून सामना जिंकला होता.


- जुलै 1990 मध्ये इंग्लंडनं पहिल्या डावात 435 धावा करून सामना जिंकला होता.


- मे 1965 मध्ये इंग्लंडने पहिल्या डावात 435 धावा करून सामना जिंकला होता.


- जून 2012 मध्ये वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णित ठरला.


- जुलै 1989 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 424 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णित ठरला.


- जुलै 1968 मध्ये इंग्लंडने पहिल्या डावात 409 धावा केल्या होत्या. सामना अनिर्णित ठरला.


- ऑगस्ट 2005 मध्ये इंग्लंडने पहिल्या डावात 407 धावा करून सामना जिंकला होता.


हे देखील वाचा-