Wimbledon 2022: राफेल नदालनं (Rafael Nadal) पुन्हा एकदा विम्बल्डनच्या अंतिम-16 मध्ये धडक दिलीय. विम्बल्डनच्या अंतिम 16 मध्ये पोहोचण्याची त्याची ही दहावी वेळ आहे. त्यानं तिसऱ्या फेरीत इटलीच्या लोरेन्झो सोनेगोचा (Lorenzo Sonego) सरळ सेटमध्ये पराभव करत नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. नदालनं दोन वेळा म्हणजेच 2008 आणि 2010 मध्ये विम्बल्डनचं विजेतेपदही जिंकलंय. यंदाच्या स्पर्धेत तो विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
विम्बल्डन 2022 च्या तिसऱ्या फेरीत नदालनं लोरेन्झोचा 6-2, 6-1, 6-4 असा पराभव केला. या सामन्यात राफेल नदाल एकहाती विजय मिळवला. लोरेन्झोनं गेल्या वेळी विम्बल्डनची चौथी फेरी गाठली होती. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील पुढच्या फेरीत नदाल कशी कामगिरी करतोय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ट्वीट-
विम्बल्डन 2022 स्पर्धेच्या चौथ्या फेरीत नदालचा सामना 21व्या मानांकित डच खेळाडू बोटिक व्हॅन डी गेंडशल्पशी होणार आहे. त्यानं तिसऱ्या फेरीत फ्रेंच अनुभवी खेळाडू रिचर्ड गॅस्केटचा 7-5, 2-6, 7-6 (9/7), 6-1 असा पराभव केला. गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनमध्येही नदाल आणि बोटिक आमनेसामने आले होते. या सामन्यात नदालचं वर्चस्व पाहायला मिळालं. त्यानं सहज बोटिकचा पराभव केला होता.
हे देखील वाचा-