ENG vs IND : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील मैदानात रंगणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपले अंतिम 11 शिलेदार जाहीर केले आहेत. भारताच्या मागील दौऱ्यातील हा उर्वरीत कसोटी सामना उद्या अर्थात 1 जुलै रोजी सुरुवात होणार असून यासाठी इंग्लंडने काही दिवसांपूर्वी 15 सदस्यीय संघ जाहीर केला होता, आता अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली असून यावेळी बेन स्टोक्सकडेच कर्णधारपद असून जेम्स अँडरसन जो न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे तिसरा सामना खेळला नव्हता तोही संघात परतला आहे.

कसा आहे इंग्लंडचा अंतिम 11 चा संघ?

अॅलेक्स ली, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ: 

मयांक अगरवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा. रोहित शर्मा (कोरोनाबाधित)

इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत.

इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाउल
दुसरा टी-20 सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा टी-20 सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज

इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक- 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै मँचेस्टर 

हे देखील वाचा- 

Ind vs Eng, 5th Test : 'सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा', इंग्लंड दौऱ्यावरील खेळाडूंना बीसीसीआयच्या सूचना

India tour of England : कसोटी सामन्यांसह टी20 आणि वन डेचाही थरार, सामन्यांची वेळ, प्रक्षेपणाच्या चॅनेलसह सर्व माहिती एका क्लिकवर

Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?