Rohit Sharma ruled out of 5th Test against England: लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली होती. त्याचा कोरोनाचा दुसरा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आलाय. ज्यामुळं भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडं (Jasprit Bumrah) बॅर्घिंगहॅम कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय, अशी माहिती पीटीआय वृत्त संस्थेनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 1 जुलैपासून रिशेड्युल केलेला कसोटी सामना खेळला जाणार आहे.  भारतीय संघ इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र, या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली. ज्यामुळं तो बॅर्घिंगहॅम कसोटीत खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या सामन्याला काहीच तास शिल्लक असताना महत्वाची माहिती समोर आलीय. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह बॅर्घिंगहॅम कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती पीटीआयनं दिलीय. रोहितची कोरोना चाचणी पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आलीय. तो अजूनही आयसोलेशनमध्ये आहे. कसोटीत भारताचं नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह 36वा क्रिकेटपटू असेल.


पीटीआयचं ट्वीट-




इतिहास रचण्यासाठी जसप्रीत बुमराह सज्ज
बॅर्घिंगहॅम कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व करणारा 35 वर्षीय जसप्रीत बुमराह कपिल देव यांच्यानंतर भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरेल. मार्च 1987 मध्ये कपिल देव यांच्यानंतर एकाही वेगवान गोलंदाजानं कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्व केलेले नाही. मात्र, कपिल देव हे अष्टपैलू खेळाडू होते. 90 वर्षांच्या भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बुमराह हा वेगवान गोलंदाज म्हणून भारताचं नेतृत्व करणारा पहिला खेळाडू असेल. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बुमराहला भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून बढती देण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत बुमराहनं संधी मिळाल्यास भारताचं कर्णधारपद स्वीकारण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.


हे देखील वाचा-