एक्स्प्लोर

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॉर्गनचा नवा विक्रम, रोहितला टाकले मागे, एका सामन्यात सर्वाधिक सिक्सर ठोकले

विशेष म्हणजे या सामन्याआधी मॉर्गनला दुखापत झाल्याची माहिती होती. तो या सामन्यात खेळेल की नाही याबाबत देखील साशंकता होती. मात्र त्याने कर्णधाराला साजेशी खेळी करत आज एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

मँचेस्टर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध षटकारांची बरसात केली. मॉर्गनच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर 397 धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्णधार मॉर्गनने शानदार खेळी करत केवळ 57चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने  71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 148 धावांची खेळी केली.  मॉर्गनने भारताचा सिक्सर किंग रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला.  रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती. त्या खेळीत त्याने 16 षटकार खेचले होते. विशेष म्हणजे या सामन्याआधी मॉर्गनला दुखापत झाल्याची माहिती होती. तो या सामन्यात खेळेल की नाही याबाबत देखील साशंकता होती. मात्र त्याने कर्णधाराला साजेशी खेळी करत आज एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात षटकारांचा पाऊसच पडल्याचे दिसून आले. सामन्यात इंग्लंडकडून तब्बल 25 षटकार ठोकले गेले. यातील 17 षटकार एकट्या मॉर्गनने ठोकले तर मोईन अलीने देखील शेवटी येत चार षटकार ठोकले. बेअरस्टोनं देखील तीन षटकार ठोकत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मॉर्गनसह जॉनी बेअरस्टोनं 90 तर ज्यो रुटनंही 88 धावांची खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला 50 षटकांत सहा बाद 397 धावांचा डोंगर उभारता आला. यंदाच्या विश्वचषकातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 44 धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी 120 धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा बेअरस्टो शतकाला मात्र मुकला. तो 90 धावांवर बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : आयसीसीचा टीम इंडियाला दणका, कॅप्टन श्रेयस अय्यरकडून शिक्षा मान्य, पहिल्या कसोटीपूर्वी भारतावर कारवाई कशामुळं?
आयसीसीचा टीम इंडियाला दणका, पहिल्या कसोटीपूर्वी भारतावर कारवाई कशामुळं?
IND vs NZ 1st Test Day-1 Time : पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही
पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही
IND vs NZ 1st Test Live Streaming : ना सबस्क्रिप्शन, ना अतिरिक्त खर्च! भारत-न्यूझीलंड पहिला कसोटी सामना FREE मध्ये पाहता येणार, कुठे आणि कसा? जाणून घ्या A टू Z
ना सबस्क्रिप्शन, ना अतिरिक्त खर्च! भारत-न्यूझीलंड पहिला कसोटी सामना FREE मध्ये पाहता येणार, कुठे आणि कसा? जाणून घ्या A टू Z
IND vs NZ 1st Test : न्यूझीलंडविरुद्ध उद्यापासून कसोटीचा थरार! गिल-राहुल परतले, बुमराहही सज्ज; 9 नवे चेहरे मैदानात उतरणार, अशी असेल टीम इंडियाची Playing XI
न्यूझीलंडविरुद्ध उद्यापासून कसोटीचा थरार! गिल-राहुल परतले, बुमराहही सज्ज; 9 नवे चेहरे मैदानात उतरणार, अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget