India vs England T20Is : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेचा रोमांच बुधवारपासून सुरू होणार आहे. इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर 5 टी-20 सामने तसेच 3 एकदिवसीय सामने खेळेल. ही टी-20 मालिका 22 जानेवारीपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर सुरू होणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाने आपला प्लेइंग-11 जाहीर केला आहे. कोलकात्याची खेळपट्टी लक्षात घेऊन, इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक, दोन नाही तर तब्बल 4 वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे.


कर्णधार जोस बटलरच्या जागी फिल साल्टकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी आधीच सांगितले होते की, कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात बटलर विकेटकीपिंग करणार नाही. प्लेइंग-11 जाहीर झाल्यानंतर, बटलरच्या जागी फिल साल्ट यष्टिरक्षक भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झाले.


यष्टीरक्षकाव्यतिरिक्त फिल साल्ट बेन डकेटसह फलंदाजीची सुरुवात करेल. त्याच वेळी, कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. गस अ‍ॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्याव्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या रूपात एका अष्टपैलू खेळाडूला अंतिम अकरा जणांमध्ये संधी देण्यात आली आहे.


भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी इंग्लंड संघाची प्लेइंग-11 : बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, गस अ‍ॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.






भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (उपकर्णधार), ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.


टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).


हे ही वाचा -


Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना