Indian Women Cricket : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Womens Cricket team) नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) रौप्यपदक मिळवलं. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेला भारतीय संघ आता इंग्लंड सर करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय महिला आणि इंग्लंडच्या महिलांमध्ये आधी तीन टी20 सामने आणि नंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. 10 सप्टेंबरपासून हे सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी भारताने आपला संघही जाहीर केला असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. 

कसा आहे भारतीय संघ?

टी-20 संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सबनेनी मेघना, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), के.पी. नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा,  स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा  रॉड्रिग्ज, राधा यादव, दयालेन हेमलथा, सिमरन दिल बहादुर, राधा यादव, हरलीन देवोल. 

एकदिवसीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सबनेनी मेघना, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक),  यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा,  स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा  रॉड्रिग्ज, राधा यादव, दयालेन हेमलथा, सिमरन दिल बहादुर, झुलन गोस्वामी, हरलीन देवोल. 

कसं आहे वेळापत्रक?

दिवस दिनांक वेळ सामना ठिकाण
शनिवार 10 सप्टेंबर सायंकाळी 7.00 पहिला टी20 सामना रिव्हरसाईड, डरहम
मंगळवार 13 सप्टेंबर सायंकाळी 6.30 दुसरा टी20 सामना इंकोरा काउंटी ग्राउंड, डर्बी
गुरुवार 15 सप्टेंबर सायंकाळी 6.30 तिसरा टी20 सामना

ब्रिस्टल काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल

रविवार 18 सप्टेंबर दुपारी 11.00 पहिला एकदिवसीय सामना 1st सेंट्रल काउंटी ग्राउंड, होव्ह
बुधवार 21 सप्टेंबर दुपारी 01.00 दुसरा एकदिवसीय सामना कँटरबरी
शनिवार 24 सप्टेंबर दुपारी 11.00 तिसरा एकदिवसीय सामना लॉर्ड्स

हे देखील वाचा-