ट्रेंट ब्रीज: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज ( ENG vs WI  )यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. इंग्लंडनं या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजविरोधात 2-0 अशी आघाडी घेतलेली आहे. दोन्ही संघांमध्ये दुसरी कसोटी नॉटिंघममध्ये खेळवली गेली. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजला पराभव स्वीकाराव लागला होता. त्या कसोटीसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड(Mark Wood) याच्या भेदक माऱ्यामुळं वेस्ट इंडिजच्या फलंदाजाचा हात मोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वेस्ट इंडिजचा खेळाडू केविन सिंक्लेयर( Kevin Sinclair) दुखापतग्रस्त झाला असून तिसऱ्या कसोटीतून त्याला बाहेर जावं लागलं आहे. 


वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हा प्रकार घडला. वेस्ट इंडिज नॉटिंघम कसोटीत 385 धावांचा पाठलाग करत असताना मार्क वूडच्या बॉलिंगवर हा प्रकार झाला. वेस्ट इंडिजनं 82 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. डावाच्या 24 व्या ओव्हरमध्ये मार्क वूडनं बाऊन्सर टाकला होता. तो बाऊन्सर बॉडी लाईन असल्यानं केविन सिंक्लेयरनं बॅट पुढं केली. त्याच्या कोपरावर जाऊन बॉल आदळला. इंग्लंडनं अपिल केली आणि पंचांनी त्याला बाद दिलं गेलं. यावेळी सिंक्लेयरनं डीआरएस घेतला मात्र त्याला दुखापतीमुळं हात धरुन खाली बसावं लागलं होतं 


केविन सिंक्लेयर दुखापतग्रस्त


डीआरएसमध्ये सिंक्लेयरच्या ग्लोव्जचा छोट्या भागाला बॉलनं स्पर्श केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं त्याला बाद दिलं गेलं. त्यानं 17 बॉलमध्ये केवळ 1  रन केली. हाताला दुखापत झाल्यानं सिक्लेयर संघाबाहेर गेलाहोता. आता त्याच्या जागी तिसऱ्या कसोटीत गुडाकेश मोटी याला संधी दिली जाणार आहे. गुडाकेशनं पहिल्या कसोटीत सहभाग घेतला होता मात्र दुसऱ्या कसोटीत तो आजारी असल्यानं खेळू शकला नव्हता. आता त्याला तिसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अल्जारी जोसेफ संघाबाहेर जाऊ शकतो.  






संबंधित बातम्या :


IND vs SL: गौतम गंभीर रियान पराग ऐवजी मुंबई इंडियन्सच्या युवा खेळाडूला संधी देणार होता, एका गोष्टीमुळं सगळं फसलं


Test Cricket : कसोटीत एका दिवसात 600 धावा करणार, इंग्लंडच्या स्टार खेळाडूचा दावा, क्रिकेट विश्वात खळबळ