India vs West Indies Live : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (2nd ODI) उद्या अर्थात रविवारी (24 जुलै) खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असल्याने आता भारताला मालिका जिंकण्यांची संधी असून वेस्ट इंडीजला मालिकेत बरोबरी मिळवण्याची संघी आहे. भारताने नुकतच इंग्लंडला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय आणि टी20 मालिकेत मात दिल्यानंतर आता वेस्ट इंडीजला मात देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. तर आजचा हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


कधी आहे सामना?


उद्या 24 जुलै रोजी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेन याठिकाणी खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येणार आहे. फॅन कोड या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   


वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ


शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.


हे देखील वाचा-