ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला 2 जूनपासून सुरुवात झाली. लंडनमधील (London) लॉर्ड्सवर (Lord's) मैदानावर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ अवघ्या 132 धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघ डगमताना दिसला. पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडनं पहिल्या डावात 116 धावा केल्या आणि सात विकेट्स गमावले आहेत. बेन फॉक्स (6 धावा) आणि स्टुअर्ट ब्रॉड (4 धावा) सध्या क्रिजवर उपस्थित आहेत. न्यूझीलंडकडून टीम साऊथी, काईल जेम्सन आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.
न्यूझीलंडचा संघ 132 धावांवर गारद
पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लिश वेगवान गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 132 धावांत गारद झाला. कॉलिन डी ग्रँडहोम संघाचा तारणहार ठरला, त्यानं 42 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला 132 धावांपर्यंत पोहचवलं. इंग्लिश वेगवान गोलंदाज मॅटी पॉट्सनं या सामन्यातून कसोटी पदार्पण केले आणि पहिल्या डावात 4 विकेट्स घेतले.
न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय फसला
लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. दुपारच्या जेवणापर्यंत न्यूझीलंडच्या संघानं 39 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. यानंतर संघाच्या 102 धावांवर 9 खेळाडू बाद झाले. अखेरीस टीम साऊदीनं 26 आणि ट्रेंट बोल्टनं 14 धावांच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाला 132 धावांपर्यंत मजल मारता आली.
इंग्लंडची भेदक गोलंदाजी
न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मॅटी पॉट्स आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं कसोटी पदार्पण करत दोघांनीही प्रत्येकी चार- चार विकेट्स घेतल्या. याशिवाय स्टुअर्ट ब्रॉड आणि कर्णधार बेन स्टोक्स यांना एक-एक विकेट मिळवली.
हे देखील वाचा-