ENG vs NZ 1st Test: न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. येथे 2 जूनपासून लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 132 धावांत गारद झाला होता. यानंतर त्यानं जोरदार कमबॅक करत दिवसाअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 236 धावा केल्या.


डॅरेल मिशेल आणि टॉम ब्लंडेल जोडीची कमाल
दरम्यान, न्यूझीलंड संघानं इंग्लंडवर 227 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या डॅरेल मिशेल नाबाद 97 आणि टॉम ब्लंडेल 90 धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 180 धावांची नाबाद भागेदारी झाली. यजमान इंग्लंडचा संघही पहिल्या डावात अप्रतिम खेळ करू शकला नाही आणि केवळ 141 धावांवरच गारद झाला. इंग्लिश संघाला पहिल्या डावात केवळ 9 धावांचीच आघाडी घेता आली. पहिल्या दोन डावात फक्त वेगवान गोलंदाजांनी 20 विकेट्स घेतल्या.


इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ ढेपाळला
लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुपारच्या जेवणापर्यंत न्यूझीलंडच्या संघानं 39 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. यानंतर संघाच्या 102 धावांवर 9 खेळाडू बाद झाले. अखेरीस, टीम साऊदीने 26 आणि ट्रेंट बोल्टने 14 धावा करत संघाला 132 धावांपर्यंत नेले. न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मॅटी पॉट्स आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं कसोटी पदार्पण करत 4-4 विकेट घेतल्या. याशिवाय स्टुअर्ट ब्रॉड आणि कर्णधार बेन स्टोक्स यांना 1-1 विकेट्स मिळाली.


टीम साऊथी, ट्रेंट बोल्टची भेदक गोलंदाजी
यानंतर इंग्लंडचा संघ मैदानात उतरला, त्यामुळे त्याची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडनं 59 धावांवर पहिली विकेट गमावली, पण त्यानंतर यजमानांचा टिकाव लागू शकला नाही. न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज टिम साऊथी, ट्रेंट बोल्ट यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडला 141 धावांवर रोखले. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीनं 43 धावा केल्या. साऊथीनं चार आणि ट्रेंट बोल्टनं तीन विकेट्स घेतल्या. काइल जेम्सन आणि कॉलिन डी ग्रँडहोमनला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.


हे देखील वाचा-


On This Day: 'शेन वार्न'च्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी'ला 29 वर्ष पूर्ण, चमत्कारी चेंडूचा व्हिडिओ एकदा बघाच!


आकाश चोप्राच्या 'त्या' वक्तव्यावर भडकला पोलार्ड; आधी ट्वीट केलं, त्यानंतर थोड्यावेळानं...


ENG vs NZ:  जो रूटचा नवा पराक्रम! सचिन, द्रविडच्या पंक्तीत स्थान; मोठ्या विक्रमापासून फक्त 100 धावा दूर