IND vs ENG 5th Test Playing 11 : टीम इंडिया बलाढ्य इंग्लंड संघाविरुद्ध उद्या (1 जुलै) मैदानात उतरणार आहे. इंग्लंडचा कसोटी संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून नुकतीच त्यांनी न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिली. दुसरीकडे भारताचा कर्णधार रोहित शर्मा कोरोनाबाधित झाल्यामुळे संघाबाहेर गेला आहे. जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद असून ऋषभ पंत उपकर्णधार आहे. दरम्यान त्यामुळेच आज भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील सामना कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल हे असून स्पष्ट झालेलं नाही. पण तरी संभाव्यपणे कोणत्या 11 खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


अशी असू शकते संभावित प्लेईंग 11 - चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (कर्णधार),मोहम्मद सिराज.


दुसरीकडे इंग्लंड संघाने आधी 15 सदस्यीय संघ आणि नंतर आज अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.


इंग्लंडचे अंतिम 11 : अॅलेक्स ली, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.


बर्मिंगमहमध्ये विजय अवघड


भारताने 1967 साली सर्वात आधी इंग्लंडविरुद्ध या मैदानात सामना खेळला होता. त्यावेळी भारताचा पराभव झाला. पुढील दरवर्षी जेव्हा-जेव्हा भारत या मैदानात इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला त्या-त्या वेळी भारताला पराभव पत्करावा लागला. केवळ 1986 साली सामना अनिर्णीत सुटला होता. त्यानंतरही भारताची पराभवाची मालिका कायम राहिली. भारताने एकूण 7 सामने या मैदानात खेळले असून 6 गमावले असून एक अनिर्णीत सुटला आहे.


हे देखील वाचा- 


Rishabh Pant : सेल्फी घ्यायला आले फॅन्स, पण ऋषभ पंतने केलं असं काही की सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव 


India tour of England : कसोटी सामन्यांसह टी20 आणि वन डेचाही थरार, सामन्यांची वेळ, प्रक्षेपणाच्या चॅनेलसह सर्व माहिती एका क्लिकवर


Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?