Rohit Sharma Breaks Virat Kohli’s Captaincy Record: साउथॅम्प्टनच्या (Southampton) द रोज बाउल (The Rose Bowl) स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) विराट कोहीलाचा (Virat Kohli) खास विक्रम मोडला आहे. इंग्लंडविरुद्ध रोहित शर्मानं छोटी आणि दमदार खेळी केली. त्यानं 14 चेंडूत 24 धावा केल्या. याच खेळीच्या जोरावर रोहित शर्मा टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा ठोकणारा भारतीय कर्णधार ठरलाय. 

Continues below advertisement

रोहित शर्माचा नवा पराक्रमनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या रोहित शर्मानं 14 चेंडूत 24 धावा केल्या. ज्यात पाच चौकारांचा समावेश आहे. या खेळीच्या जोरावर रोहितनं विराट कोहलीचा खास विक्रम मोडलाय. विराट कोहलीनं कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 30 डावांत 1000 धावांचा टप्पा गाठला होता. परंतु, रोहित शर्मानं 29 व्या डावातचं अशी कामगिरी करून दाखवली आहे.  

रोहित शर्माची टी-20 क्रिकेटमधील कामगिरीटी-20 क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजाच्या यादीत रोहित शर्माचाही समावेश केला जातो. रोहितनं आतापर्यंत 125 टी-20 आतंरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात 3 हजार 313 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान, त्यानं चार शतक आणि 26 अर्धशतकं झळकावली आहे. त्याची  टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम धावसंख्या 118 धावा आहे. टी-20 फॉरमेटमध्ये त्यानं आतापर्यंत 293 चौकार आणि 155 षटकार ठोकले आहेत. तसेच 50 झेल घेतल्या आहेत. 

Continues below advertisement

भारताचा पहिल्या टी-20 मध्ये विजयभारत आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 50 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या विजयात हार्दिक पांड्यानं मोलाचा वाटा उचलला आहे. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीतही दमदार कामगिरी करून दाखवली आहे. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यानं 29 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत इंग्लंजच्या चार फलंदाजाला माघारी धाडलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

हे देखील वाचा-