ENG vs IND 1st T20: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतानं इंग्लंडला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाची धुळ चाखली. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 50 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयामुळं रोहित शर्माच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामने जिंकणार रोहित शर्मा पहिला कर्णधार ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला सलग 13 सामने जिंकता आले नाहीत. 

भारतीय टी-20 संघाचा उत्कृष्ट कर्णधार
दरम्यान, मागील टी-20 विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं भारतीय टी-20 संघाचा राजीनामा दिला. त्यानंतर रोहित शर्माकडं भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून आतापर्यंत 13 टी-20 सामने खेळले आहेत. भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्यानं बांग्लादेशविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 4, वेस्ट इंडीजविरुद्ध 3, श्रीलंकाविरुद्ध 3 आणि इंग्लंड एक टी-20 सामना जिंकलाय. रोहितच्या नेतृत्वात भारतीय टी-20 संघानं सलग तीन मालिकेत विरोधी संघाला क्लीन स्वीप दिलं आहे. ज्यात न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेचा समावेश आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं जिकलेले सलग 13 टी-20 सामने-

बांलादेश विरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका-

पहिला टी-20 सामना  भारताचा आठ विकेट्सनं विजय
दुसरा टी-20 सामना भारताचा सात धावांनी विजय

 

न्यूझीलंडविरुद्ध चार सामन्यांची टी-20 मालिका-

 

पहिला टी-20 सामना भारताचा सात धावांनी विजय
दुसरा टी-20 सामना भारताचा पाच विकेट्नं विजय
तिसरा टी-20 सामना भारताचा सात विकेट्सनं विजय
चौथा टी-20 सामना भारताचा 73 धावांनी विजय

 

वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका-

पहिला टी-20 सामना भारताचा सात विकेट्सनं विजय
दुसरा टी-20 सामना भारताचा आठ विकेट्नं विजय
तिसरा टी-20 सामना भारताचा 17 धावांनी विजय

 

श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका-

पहिला टी-20 सामना भारताचा 62 धावांनी विजय
दुसरा टी-20 सामना भारताचा सात विकेट्सनं विजय
तिसरा टी-20 सामना भारताचा 6 विकेट्सनं विजय

 

इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 50 धावांनी विजय

 

हे देखील वाचा-