Dinesh Karthik on Babar Azam : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर सर्वत्र चर्चेत आहे. क्रिकेट जगतात सध्या तो आघाडीचा फलंदाज आहे. सध्या बाबर आझम व्हाईट बॉल क्रिकेट अर्थात एकदिवसीय आणि टी20 दोन्हीमध्ये नंबर एकवर आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. पण त्याच्या खेळीच्या जोरावर लवकरच तो टेस्टमध्ये नंबर एकवर जाऊन तिन्ही क्रिकेट फॉर्मेटमध्ये नंबर 1 होऊ शकतो, असं भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) म्हटलं आहे. 


दिनेश कार्तिक म्हणाला...


कार्तिक सध्या आयपीएल 2022 मध्ये दमदार प्रदर्शन करत असून त्याचा संघ रॉयल चँलेजर्स बंगळुरुने क्वॉलीफायर 2 पर्यंत मजल मारली आहे. दरम्यान कार्तिकने शुक्रवारी आयसीसी (ICC) च्या रिव्यू शोमध्ये संजना गणेसनशी बोलताना बाबर आझमचं कौतुक केलं. बाबर तिन्ही क्रिकेट प्रकारात दमदार खेळी करत आहे. त्याने सर्व फॉर्मेटमध्ये चांगली खेळी केली असून त्याच्या भविष्यातील खेळीसाठी त्याला शुभेच्छा! मला वाटतं लवकरच तो तिन्ही क्रिकेट प्रकारात नंबर एकवर पोहोचेल, असं कार्तिक म्हणाला. 


आझम कसोटीमध्येही चांगल्या फॉर्ममध्ये


बाबर आझमने 3,000 टेस्ट रन केले असून ही कामगिरी त्याने 40 सामन्यात केली आहे. यावेळी 196 हा त्याचा सर्वोच्च स्कोर होता. 21 अर्धशतकं त्याने यावेळी ठोकली असून सहा शतकंही ठोकली आहेत. यावेळी त्याची फलंदाजीची सरासरी 45.98 इतकी होती. दरम्यान कार्तिकने बाबरला त्याच्या फलंदाजीत काहीसा बदल केल्यास तो आणखी चांगला खेळाडू बनू शकतो.


हे देखील वाचा-