Glenn Phillips Catch Of Virat Kohli : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप टप्प्यातील न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहली 11 धावा काढून बाद झाला. हा कोहलीचा 300 वा एकदिवसीय सामना होता आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील तो पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. फिलिप्सने विराट कोहलीचा एक न भुतो न भविष्यति असा कॅच घेतला आणि 11 धावांवर त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याच्या बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माही नाराज दिसली.
रोहित शर्मा (15) आणि शुभमन गिल (2) यांच्या रूपात सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर कोहलीवरील दबाव आणि जबाबदारी आणखी वाढली. पण, तोही स्वस्तात बाद झाला. सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कोहलीने ऑफ साईडवर एक शॉट खेळला. पॉइंटवर उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्सने हवेत उडी मारली आणि एक शानदार कॅच घेतला. कोहली बाद झाल्यानंतर सर्व भारतीय चाहते निराश झाले. स्टँडमध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीनेही कपाळावर हात मारला, तीही दुःखी झाली.
अनुष्का शर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो विराट कोहली आउट झाल्यानंतरचा आहे. अनुष्का कपाळाला हात लावते आणि काही शब्द बोलते. काही वापरकर्ते असा दावा करत आहेत की, अनुष्काने रागाच्या भरात शिवीगाळ गेली, पण ती असे कही करताना दिसत नाही.
कोहली 300 सामने खेळणारा सातवा भारतीय खेळाडू
विराट कोहलीचा हा 300 वा एकदिवसीय सामना आहे. हा आकडा गाठणारा तो भारतातील सातवा खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा खेळाडू आहे, त्याने त्याच्या कारकिर्दीत 463 एकदिवसीय सामने खेळले. या यादीत एमएस धोनी (35), राहुल द्रविड (344), मोहम्मद अझरुद्दीन (334), सौरव गांगुली (311) आणि युवराज सिंग (304) यांचा समावेश आहे.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. मात्र, हा सामना महत्त्वाचा आहे कारण त्याचा निकाल ठरवेल की उपांत्य फेरीचे सामने कोणत्या संघांमध्ये खेळवले जातील. भारत 4 मार्चला दुबईत उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे, तर न्यूझीलंडचा उपांत्य सामना 5 मार्चला होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल आणि पराभूत झालेला संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.
हे ही वाचा -