Champions Trophy 2025 South Africa : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाच्या कार्यवाहक कर्णधारपदी एडन मार्करामची निवड करण्यात आली होती. नियमित कर्णधार टेम्बा बावुमाच्या अनुपस्थितीत मार्करामने संघाची सूत्रे हाती घेतली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ फक्त 179 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेने रॅसी व्हॅन डर ड्यूसेन आणि हेनरिक क्लासेन यांच्या खेळीच्या जोरावर 29.1 षटकांत 3 गडी गमावून 180 धावांचे लक्ष्य गाठले.
दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला, पण एडन मार्करामला दुखापत झाली. इंग्लंडविरुद्ध कार्यवाहक कर्णधार म्हणून क्षेत्ररक्षणाला उतरताना मार्करामला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि संपूर्ण वेळ मैदानाबाहेरच राहिला. या परिस्थितीत, हेनरिक क्लासेनने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि इंग्लंडला 39 षटकांतच गुंडाळले.
मार्करामने दुखापतीबद्दल अपडेट
यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 174 धावांवर तिसरी विकेट गमावली, तेव्हा मार्कराम फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. यानंतर, त्याला गंभीर दुखापत झाल्याची अटकळ सुरू झाली. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर एडन मार्करामने त्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट दिली. उपांत्य फेरी गाठल्यानंतर, मार्कराम म्हणाला की, त्याला त्याच्या हॅमस्ट्रिंगची फारशी समस्या नाही आणि पुढील काही दिवसांत विश्रांती घेतल्यास तो बरा होईल अशी आशा आहे.
परिस्थितीशी लवकर जुळवून घेतल्याबद्दल एडेन मार्करमने त्याच्या गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला की, सुरुवातीला खेळपट्टी संथ होती, मुलांनी परिस्थितीशी खूप चांगले जुळवून घेतले. मार्को जॅन्सेनबद्दल बोलताना तो म्हणाला की, आमच्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे, तो सुरुवातीला विकेट घेतो आणि त्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधतो आणि तो कागिसो रबाडासोबत एक चांगली जोडी देखील बनवतो.
हे ही वाचा -