भारताने न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ट्रॉफीवर नाव कोरले. त्यानंतर केवळ देशातच नाही तर परदेशातही उत्सवाचे वातावरण होते. पण यादरम्यान अशी घटना घडली की, ती ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले. खरंतर, उत्तर प्रदेशातील देवरिया येथील 14 वर्षीय प्रियांशी पांडे हिचा रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना पाहत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आता विद्यार्थ्याच्या वडिलांनीही यावर सत्य सांगितले आहे.
तिकडं दुबईत विराट कोहली आऊट, इकडं 14 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक?
सुरुवातीच्या अहवालांनुसार, विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर ती बेशुद्ध पडली होती, परंतु तिच्या कुटुंबाने तिच्या मृत्यूचा आणि सामन्याचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, वडील अजय पांडे यांची मुलगी प्रियांशी तिच्या कुटुंबासह सामना पाहत असताना अचानक बेशुद्ध पडली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले.
वडिलांनी सांगितलं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या रात्री काय घडलं?
घटनेच्या वेळी तिचे वडील बाजारात गेले होते आणि त्यांना लगेच कळवण्यात आले, ते तिला रुग्णालयात नेण्यासाठी घरी गेले. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. पण माझ्या लेकीच्या मृत्यूचा आणि कोहलीच्या आऊट होण्याचा कोणताही संबंध नाही. खरंतर, विराट आऊट झाल्यानं प्रियांशीला धक्का बसला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं. पण त्यात कोणतंच तथ्य नाही.
वडील आणि शेजाऱ्यांनी सामन्यादरम्यान कोहलीच्या बाद झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. तिचे वडील म्हणाले की, प्रियांशी बेशुद्ध पडली तेव्हा भारताची फलंदाजी सुरु होती, ही गोष्ट खरी आहे. पण तिच्या मृत्यूचा आणि कोहलीच्या आऊट होण्याचा काही संबंध नाही. कारण ही घटना घडली, त्यावेळी विराट कोहली खेळण्यासाठी आला नव्हता आणि भारतीय संघ सामन्यात चांगल्या परिस्थितीत होता.
मुलीचे शेजारी अमित चंद्र यांनी ही घटना पाहिली. भारताने एकही विकेट गमावली नसताना प्रियांशी बेशुद्ध पडल्याची त्यांनी पुष्टी केली.
हे ही वाचा -