मुंबई : विश्वविजेत्या (T20 World Cup 2024) टीम इंडियाचा (Team India) विधानभवनात (Vidhan Bhavan) सत्कार पार पडला. विधानभवनात विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. टी20 विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला.


रोहित शर्माचं मराठीत भाषण


रोहित शर्मा याने यावेळी मुंबईकर शैलीत सर्वांना अभिवादन करत म्हटलं की, 'सर्वांना माझा नमस्कार. येथे बोलावल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खूप खूप आभार. आमच्यासाठी विधानभवनात असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार. काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होतं. विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं. 2023 मध्ये संधी हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं नाही, असं नाही तर हे सर्वांमुळे सिद्ध झालं आहे. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यामुळे हे होऊ शकले.  प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता.  त्याच्या हातात कॅच बसला नसता.. बरं झालं हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी पुढे बसवले असते. सर्वांचे खूप खूप आभार.'


विधानभवनात विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार समारंभ






'हा क्षण मी कधीच विसरु शकत नाही'


सूर्यकुमार यादव यावेळी सर्वांसमोर मनोगत मांडताना म्हणाला की, इथं असलेल्या सर्वांना भेटून चांगले वाटते. हा प्रसंगही मी कधीच विसरु शकत नाही. सर्वांचे खूप खूप आभार. माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी शब्द नाहीत, असे सूर्या म्हणाला.  सूर्यकुमार यादवने यावेळी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. त्याशिवाय आपण आणखी एका विश्वचषक नावावर करु, असा विश्वास व्यक्त केला. 






मुख्यमंत्र्यांकडून वर्षा निवासस्थानी सत्कार


याआधी जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी स्वागत केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ