एक्स्प्लोर

IND vs SL Test Series : कुणाच्या पाठीवर नंबरचा टॅटू, तर कोणाच्या खांद्यावर काळे-निळे डाग; कोलंबोतील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पाहून सगळे हादरले

Ind vs Sl 2nd Colombo Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 1-0 अशी जिंकली.

Ind vs Sl 2nd Colombo Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 1-0 अशी जिंकली. गॉलमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने 165 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर कोलंबोमध्ये रंगलेली दुसरी कसोटी मात्र पाच दिवसानंतर अनिर्णित राहिली. त्यामुळे मालिका भारताच्या नावावर झाली असली, तरी दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने भारताला विजयापासून रोखत जोरदार झुंज दिली. कोलंबो कसोटीमध्ये भारतीय खेळाडूंना फक्त प्रतिस्पर्धी संघाशीच नाही, तर श्रीलंकेतील उन्हाशी आणि मैदानावरील शारीरिक संघर्षाशीही सामना करावा लागला. स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कलच्या पाठीवर उमटलेला जर्सी टॅटू आणि ऋषभ पंतच्या खांद्यावरील निळे डाग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

पडिक्कलच्या पाठीवर उमटला जर्सी टॅटू

या कसोटी मालिकेत देवदत्त पडिक्कलने आपल्या फलंदाजीने जबरदस्त छाप पाडली. गॉल कसोटीत पडिक्कलने पहिल्या डावात तब्बल 167 धावांची शानदार खेळी केली. दुसऱ्या डावातही त्याने 44 धावांचे योगदान दिले. त्यानंतर कोलंबो कसोटीत त्याने पुन्हा एकदा शतक ठोकत 117 धावांची दमदार खेळी केली. या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. मात्र, पडिक्कलची एक वेगळीच गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

श्रीलंकेतील कडक उन्हात अनेक तास मैदानावर राहिल्यामुळे त्याच्या पाठीवर त्याने घातलेल्या जर्सीचा टॅन स्पष्टपणे उमटला. पडिक्कलने आपल्या पाठीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये त्याच्या जर्सीवरील देव हे नाव आणि 37 हा क्रमांक उन्हामुळे शरीरावर चक्क छापल्यासारखा दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Shared post on

ऋषभ पंतच्या खांद्यावर संघर्षाचे निळे निशाण

दुसरीकडे, सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेगवान गोलंदाजाचा चेंडू ऋषभ पंतच्या मनगटावर जोरात लागला. त्यामुळे पंतला अवघ्या 3 धावांवर रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. मात्र दुखापतीनंतरही पंतने हार मानली नाही. त्याने पुन्हा मैदानात पुनरागमन केलं आणि अवघ्या 89 चेंडूंमध्ये 63 धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याच्या नेहमीच्या आक्रमक फलंदाजीची झलक पाहायला मिळाली. इतकंच नाही, तर दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना पंतच्या खांद्यावरही काही चेंडू लागले. त्यामुळे त्याच्या खांद्यावर निळे डाग आणि सूज आली. दुखापतीमुळे त्याला तिसऱ्या दिवशी यष्टिरक्षणाची जबाबदारीही पार पाडता आली नाही. मात्र, त्याने पुन्हा एकदा जिद्द दाखवत चौथ्या दिवशी यष्टिरक्षणासाठी मैदानात पुनरागमन केलं.  सामना संपल्यानंतर पंतने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये त्याच्या खांद्यावर झालेली सूज आणि निळे निशाण स्पष्टपणे दिसत होते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Shared post on

हे ही वाचा -

Devdutt Padikkal : देवदत्त पडिक्कल ट्रॉफी मिळाली; पण श्रीलंकेची दाणादाण उडवणारा 'हा' खेळाडू राहिला रिकाम्या हाती

किरण गणपत महानवर हे मूळचे पुण्याचे असून, त्यांना डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे चार वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात सकाळमधून केली. सकाळमध्ये सुमारे अडीच वर्षे मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून काम करताना त्यांनी क्रीडा पत्रकारिता आणि डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव व कौशल्य विकसित केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 पासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. क्रीडा पत्रकारिता हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. 

गेल्या काही वर्षांत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. यामध्ये फिफा वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स, क्रिकेट वर्ल्ड कप, महिला क्रिकेट वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल, तसेच भारतीय क्रिकेट संघाचे विविध देशांतील दौरे आणि इतर प्रमुख क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र केसरी, प्रो कबड्डी लीग आणि हॉकीसारख्या स्पर्धांचेही त्यांनी वार्तांकन केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील आवड, लेखनशैली आणि डिजिटल माध्यमांमधील अनुभव यांच्या जोरावर ते वाचकांपर्यंत रोचक, अचूक आणि माहितीपूर्ण बातम्या व अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, प्रभावी सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती योग्य वेळी पोहोचवणे याला त्यांचे विशेष प्राधान्य असते.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Wheelchair Cricket Victory : टी-20 व्हीलचेअर क्रिकेट सामन्यात मुंबईची भेदक गोलंदाजी अन् सदाशिव शिंदेची हॅट्रिक, महाराष्ट्रावर 6 गडी राखून दणदणीत विजय
टी-20 व्हीलचेअर क्रिकेट सामन्यात मुंबईची भेदक गोलंदाजी अन् सदाशिव शिंदेची हॅट्रिक, महाराष्ट्रावर 6 गडी राखून दणदणीत विजय
Rohit Sharma Captain MI IPL 2027 : रोहित शर्माचा कर्णधारपदाला आधी नकार, मग आकाश अंबानीचा 'तो' फोन अन् 'त्या' एका भेटीत असं काय घडलं की हिटमॅनने निर्णयच बदलला? वाचा Inside Story
रोहित शर्माचा कर्णधारपदाला आधी नकार, मग आकाश अंबानीचा 'तो' फोन अन् 'त्या' एका भेटीत असं काय घडलं की हिटमॅनने निर्णयच बदलला? वाचा Inside Story
IND vs NZ 2nd Test DAY-2 Stump : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची दाणादाण! आकाश दीप चमकला, पण फलंदाजांची शरणागती; दिवसभरात नेमकं काय काय घडलं?
न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची दाणादाण! आकाश दीप चमकला, पण फलंदाजांची शरणागती; दिवसभरात नेमकं काय काय घडलं?
Suryakumar Yadav News : मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर
मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget