एक्स्प्लोर

PBKS vs DC IPL 2026 : दिल्लीची दबंगगिरी! पंजाबच्या किंग्सचा पराभवाचा चौकार, पॉइंट टेबलमध्ये टॉपच्या संघांचे धाबे दणादले

Punjab Kings vs Delhi Capitals IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 55व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सवर 3 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

Punjab Kings vs Delhi Capitals IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 55व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सवर 3 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सुरुवातीच्या 7 सामन्यात अजिंक्य राहिलेल्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सला आता सलग चौथ्या पराभवाचा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 210 धावांचा डोंगरा उभा केला. मात्र, इतकी मोठी धावसंख्या उभारूनही पंजाबच्या नशिबात पराभवच होता. दिल्लीसाठी शेवटच्या षटकांमध्ये आशुतोष शर्मा आणि माधव तिवारी यांनी फिनिशरची भूमिका बजावत अवघ्या 19 षटकांतच लक्ष्य पूर्ण केले.

पंजाबची दमदार सुरुवात

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र पंजाबच्या सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. प्रियांश आर्या (56 धावा, 33 चेंडू) आणि प्रभसिमरन सिंग (18 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची स्फोटक भागीदारी केली. प्रियांशने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 6 षटकार ठोकले.

कर्णधार श्रेयस अय्यरची 'कॅप्टन इनिंग'

सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने डावाची सूत्रे हाती घेतली. अय्यरने 36 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी करत संघाला द्विशतकी टप्पा ओलांडून दिला. त्याला मध्यफळीत कूपर कॉनोली (38 धावा) आणि शेवटच्या षटकांत सूर्यांश शेडगेने (8 चेंडूत 21* धावा) मोलाची साथ दिली. दिल्लीकडून मिचेल स्टार्क आणि माधव तिवारी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, मुकेश कुमारला 1 गडी बाद करण्यात यश आले. 

दिल्लीची खराब सुरुवात, पण मधल्या फळीने सावरले

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर केएल राहुल (9) आणि अभिषेक पोरेल (5) स्वस्तात परतले. तसंच साहिल पारख (13) आणि ट्रिस्टन स्टब्स (12) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले, त्यामुळे दिल्लीची अवस्था 4 बाद 74 अशी झाली होती.

अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलरची वादळी खेळी

संकटात सापडलेल्या दिल्लीला कर्णधार अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलर यांनी सावरले. अक्षर पटेलने 56 धावा (30 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार) तर डेव्हिड मिलर 51 धावा (28 चेंडू, 3 चौकार, 4 षटकार) केल्या. या दोघांनी पाचव्या विकेट्ससाठी 64 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून विजयाचा पाया रचला.

शेवटच्या षटकांत आशुतोष आणि माधवची फटकेबाजी

अक्षर आणि मिलर बाद झाल्यानंतर सामना पुन्हा एकदा पंजाबच्या बाजूने झुकताना दिसत होता. मात्र, आशुतोष शर्माने अवघ्या 10 चेंडूत 24 धावा केल्या. त्यानंतर माधव तिवारीने 8 चेंडूत नाबाद 18 धावा आणि औकिब नबी दारने फक्त 2 चेंडूत 10 धावा फटकावून दिल्लीला 19व्या षटकातच विजय मिळवून दिला.

गुणतालिकेतील समीकरण बदलले

या पराभवानंतरही पंजाब किंग्स गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे, पण त्यांच्या प्ले-ऑफच्या वाटेत अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सने मोठी झेप घेतली आहे.

हे ही वाचा -

Tim David News : LIVE कॅमेऱ्यात कैद झाली टीम डेव्हिडची लाजिरवाणी हरकत; व्हिडीओ व्हायरल होताच BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget