Deepak Hooda T20 Debut: भारत आणि श्रीलंका यांच्यातील (IND Vs SL) तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना आज लखनऊच्या (Lucknow) भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कप्तान दासुन शनाकानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारताचा युवा फलंदाज दिपक हुडानं पहिल्या टी-20 सामन्यातून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. 


श्रीलंकाविरुद्ध पहिल्या टी-20 मालिकेतून सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर दुखापतीमुळं बाहेर झाले आहेत. तर, विराट कोहली, ऋषभ पंत यांना बीसीसीआयने ब्रेक दिला आहे. आता भारताकडे 16 जणांचा संघ आहे. दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यातून दिपक हुडा टी-20 आतंरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करत आहे. त्यानं दिपक हुडा हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्यानं भारतासाठी आतापर्यंत दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर, आयपीएलचे त्यानं एकूण 80 सामने खेळले खेळले आहेत. ज्यात त्यानं 16.7 च्या सरासरीनं 785 धावा केल्या आहेत. ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 


भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 14 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे. भारताची विजयाची टक्केवारी 66.66 इतकी आहे. तर, श्रीलंकेच्या संघाची विजयाची टक्केवारी 33.33 इतकी आहे. 


संघ- 


भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल.


श्रीलंका-
पाथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असलांका, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha