Sanket Sargar: वडिलांचं पानाचं दुकान, घरची हलाखीच्या परिस्थिती; कॉमनवेल्थमध्ये रौप्यपदक जिंकणारा संकेत सरगर आहे तरी कोण?
Birmingham Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमवेल्थच्या 22 व्या हंगामात भारतीय खेळाडू आपपल्या क्षेत्रात छाप सोडताना दिसत आहे
Birmingham Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमवेल्थच्या 22 व्या हंगामात भारतीय खेळाडू आपपल्या क्षेत्रात छाप सोडताना दिसत आहे. यातच भारताचा वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरनं (Sanket Sargar) पुरूष वेटलेफ्टिंगच्या 55 किलो वजन गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत भारतासाठी रौप्यपदक जिंकलं. कॉमनवेल्थ स्पर्धेत थोडक्यात त्याचं सुवर्णपदक हुकलं. यावेळी त्याचा प्रतिस्पर्धी मोहम्मदनं 249 किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवलं. संकेत सरगर हा महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील रहिवाशी असून त्याचे वडील पानाचं दुकान आहे. आपल्या वडिलांची कामातून सुटका करण्यासाठी संकेत गेल्या अनेक वर्षांपासून धडपड करत आहे.
सांगली जिल्ह्यात संकेत सरगरच्या वडिलांची पानाचं दुकान चालवतात. त्याला आपल्या वडिलांना आराम करताना पाहायचं आहे. नुकतंच संकेतनं म्हटलं होतं की, "कॉमनवेल्थ स्पर्धेत मी सुवर्णपदक जिंकल्यास माझ्या वडिलांची मदत करेल. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मला आता त्यांना आनंदात ठेवायचं आहे." दरम्यान, हलाखीच्या परिस्थितीतून प्रयत्नांच्या जोरावर संकेतने एक मोठं यश मिळवलं आहे. त्याने केवळ आणि केवळ मेहनत आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ही कामगिरी केली असल्यानं आज त्याचं संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धेतील कामगिरीवर संकेत नाराज
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी रौप्यपदक जिंकत संकेतनं इतिहास रचला. परंतु, थोडक्यात सुवर्णपदक हुकल्यानं संकेतनं स्वत:च्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केलीय. संकेत म्हणाला की, मी खूप नाराज आहे. मला स्वत:चा राग येतोय. मी सुवर्णपदकासाठी तयारी केली होती." अशा शब्दात संकेतनं आपली प्रतिक्रिया दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला रौप्यपदक जिंकून देणाऱ्या संकेत सरगरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी म्हणाले की, "संकेत सरगरचा विलक्षण प्रयत्न! त्याचे प्रतिष्ठित रौप्यपदक ही भारतासाठी कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत चांगली सुरुवात आहे. त्याचं अभिनंदन आणि भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा."
हे देखील वाचा-
- CWG 2022: कॉमनवेल्थमच्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचं दमदार प्रदर्शन, श्रीलंकेच्या निलुका करुणारत्नेला 2-0 नं नमवलं
- ICC T20 World Cup 2022: रविचंद्रन अश्विनचं टी-20 विश्वचषकात खेळणं कठीण; भारतीय माजी खेळाडूच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष
- CSK: महेंद्रसिंह धोनी, सीएसकेसह भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; स्टार खेळाडूची दुखापतीवर मात