Smriti Mandhana Record: पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धेचा भाग असलेला भारतीय महिला संघानं दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. दरम्यान, 'अ' गटात बार्बाडोसचा पराभव करून ऑस्ट्रेलियानंतर कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाण्याचा मान पटकावलाय. 'अ' गटातून उपांत्य फेरीच्या दुसऱ्या स्थानावर भारत आणि बार्बाडोस यांच्यात चुरस होती. या करो या मरोच्या सामन्यात भारतानं बार्बाडोसचा 100 धावांनी विजय मिळवतं उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. या सामन्यात भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनानं भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. 


स्मृती मानधनाची खास विक्रमाला गवसणी
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलामीवीर स्मृती मानधनानं 2 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा गाठणारी ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू ठरलीय. भारतासाठी रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 2 हजार धावांचा टप्पा गाठला. यानंतर या यादीत शिखर धवन (1 हजार 759 धावा), मिताली राज (1 हजार 407 धावा) आणि लोकेश राहुलचा (1 हजार 392 धावा) क्रमांक लागतो.


भारतानं बार्बाडोसला 100 धावांनी नमवलं
भारताविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून बार्बाडोसच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं चार विकेट्स गमावून बर्बाडोससमोर 163 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बार्बाडोसच्या संघ 62 धावापर्यंतचं मज मारू शकला. या सामन्यात बार्बाडोसकडून किसिया नाइटनं सर्वाधिक 16 धावांची खेळी केली. त्यानंतर बार्बाडोसच्या एकही फलंदाला 15 धावांचा आकडा गाठता आला नाही. ज्यामुळं बार्बाडोसला 100 धावांनी विजय पत्कारावा लागला.


भारतीय क्रिकेट महिला संघाकडून पदकाची अपेक्षा
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ भारतीय महिला संघानं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि त्यानंतर बार्बाडोसचा पराभव करून जोरदार कमबॅक केलंय. या स्पर्धेत भारतीय महिला संघ देशासाठी पदक जिंकतील, अशी अपेक्षाही केली जात आहे. 


हे देखील वाचा-