एक्स्प्लोर

आफ्रिकेच्या विजयाचा ऑस्ट्रेलियाला फायदा, भारताला झटका, पाहा गुणतालिकेत काय झाला बदल

World Cup 2023 Points Table Update : पुण्याच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी दारुण पराभव करत गुणतालिकेत मोठा उलटफेर केलाय.

World Cup 2023 Points Table Update : पुण्याच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी दारुण पराभव करत गुणतालिकेत मोठा उलटफेर केलाय. दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत पहिल्या स्थानवर झेप घेतली आहे.  दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर टीम इंडियाला फटका बसलाय तर ऑस्ट्रेलियाला फायदा झालाय. 

गुणतालिकेत नेमका काय बदल झाला ?

दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव करत गुणतालिकेत मोठा उलटफेर केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केलेय. दक्षिण आफ्रिकेचा सात सामन्यातील हा सहावा विजय होता. दक्षिण आफ्रिका संघाने 12 गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आफ्रिका आणि भारताचे समान गुण आहेत, पण नेटरनेरटमुळे टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.  तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहचलाय. न्यूझीलंडचे सात सामन्यात तीन पराभव आणि चार विजय झालेत. 8 गुणांसह ते चौथ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडच्या पराभवाचा फायदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या संघांना झालाय. या संघाचे सेमीफायनलमध्ये पोहचण्यचे चान्सेस आणखी वाढले आहेत. 

इतर संघाची स्थिती काय ?

श्रीलंकेचा पराभव करत अफगाणिस्तानने गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली होती. पण अफगाणिस्तान संघ आता सहाव्या स्थानावर घसरलाय. पाकिस्तान संघाने पाचव्या स्थानावर  आहे.  सहा गुणांसह पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाचे समान गुण आहेत, पण सरस रनरेटमुळे पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानी आहे. श्रीलंका संघ सातव्या स्थानावर आहे.  श्रीलंका संघाचे सहा सामन्यात चार पराभव झालेत. नेदरलँडचा संघ चार गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. बांगलादेश निगेटिव्ह -1.446 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत नवव्या, इंग्लंड निगेटिव्ह -1.652 च्या खराब नेट रनरेटसह 2 गुण मिळवत दहाव्या क्रमांकावर आहे.  शाकीबच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाने विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. बांगलादेश संघाला सात सामन्यात फक्त दोन गुण मिळवता आलेत. बांगलादेशचा संघ फक्त अफगाणिस्तान संघाचा पराभव करु शकला.  बांगलादेशला सलग सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. बांगलादेशचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. 


आफ्रिकेच्या विजयाचा ऑस्ट्रेलियाला फायदा, भारताला झटका, पाहा गुणतालिकेत काय झाला बदल

न्यूझीलंडचा 190 धावांनी धुव्वा
दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा 190 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या मोहिमेत आपला सहावा विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा हा सात सामन्यांमधला सहावा विजय ठरला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात भारताइतकेच 12 गुण झाले आहेत. पण सर्वोत्तम नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं अव्वल स्थानी झेप घेतली आहे. दरम्यान, पुण्यातल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात क्विन्टन डी कॉक आणि रासी वॅन डेर ड्यूसेननं झळकावलेल्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं चार बाद 357 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर विजयासाठी 358 धावांचं आव्हान न्यूझीलंडला पेलवलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या प्रभावी आक्रमणासमोर त्यांचा अख्खा डाव 167 धावांत आटोपला. केशव महाराजनं चार, तर मार्को यान्सेननं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs ZIM 1st T20 Team India Playing XI: प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget