कराची : आयसीसीने 15 डिग्री एल्बो एक्सटेन्शन नियमाचं पुनरावलोकन करावं, तो मागे घ्यावा हा नियम क्रिकेटमध्ये ऑफ स्पिन गोलंदाजांना मारक ठरतोय अशी मागणी पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक याने केली आहे. सकलेन मुश्ताक सध्या पाकिस्तानच्या लाहोर मधील क्रिकेट बोर्ड हाय परफॉर्मन्स सेंटरचा मुख्य प्रशिक्षक आहे. 


आशियाई, कॅरेबियन आणि इतर प्रदेशातील खेळाडूंचा शारीरिक आकार वेगळा असल्याने त्याचा विचार न करता आयसीसीने हा नियम कसा तयार केला असाही सकलेन मुश्ताकने सवाल उपस्थित केला. सकलेन मुश्ताक म्हणाला की, "आशियायी खेळाडू, कॅरेबियन खेळाडू आणि इतर प्रदेशातील खेळाडूंचा शरीराचा आकार हा वेगवेगळा असतो. प्रत्येक प्रदेशातील खेळाडूच्या शरीराचा लवचिकपणा वेगळा असतो, त्यांच्या हाडाच्या जॉईन्ट्स मध्ये काही फरक असतो. त्याचा अभ्यास न करता आयसीसी या नियामाच्या निष्कर्षापर्यंत कसे काय पोहोचली हे समजत नाही."


माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक एका मुलाखतीत बोलताना म्हणाला की, "मला वाटतंय की आयसीसीने 15 डिग्री एल्बो एक्सटेन्शन नियमाचं पुनरावलोकन करावं. या नियमामुळे ऑफ स्पिन गोलंदाजांना अनेक अडचणी येताना दिसतात. मला असं वाटतं की आयसीसीच्या नियमानुसार, कोणताही गोलंदाज ऑफ स्पिन, 'दुसरा' किंवा टॉप स्पिन गोलंदाजी करु शकतो. पण जेव्हापासून 15 डिग्री एक्सटेन्शन नियम लागू करण्यात आला आहे तेव्हापासून गोलंदाजांनी ऑफ स्पिन गोलंदाजी कमी झाली आहे. बरेच ऑफ स्पिन गोलंदाज आता लेग स्पिन करु लागले आहेत."


क्रिकेटमध्ये 'दुसरा' चेंडू लोकप्रिय करणाऱ्या फिरकीपटू सकलेन मुश्ताकने कसोटी सामन्यात 208 आणि एकदिवसीय सामन्यात 288 बळी मिळवले आहेत. 


महत्वाच्या बातम्या :