ICC Awards News : 2022 या वर्षभरात विविध क्रिकेट प्रकारात (Cricket News) विविध खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ज्यानंतर  काही दिवसांपूर्वी आयसीसी पुरस्कारांची (ICC Awards) नामांकन जाहीर झाली. ज्यानंतर आता सोमवारपासून कोणता पुरस्कार कोणाला मिळाला? हे देखील जाहीर होणार आहे. 23 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत विविध श्रेणीतील एकूण 18 पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. पाच सांघिक पुरस्कार आणि 13 वैयक्तिक पुरस्कारांचा समावेश असणार आहे. 

आयसीसीने मागील महिन्यात या पुरस्कारांसाठी संघ आणि खेळाडूंची निवड केली होती, ज्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमीकडून मतदान करण्याचा पर्याय होता. मतदानाचा कालावधी आता संपला आहे. अशा स्थितीत केवळ पुरस्कारांची घोषणा होणं बाकी आहे.

कोणत्या पुरस्काराची घोषणा कधी होणार?

23 जानेवारी

1. ICC महिला T20 टीम ऑफ द इयर2. ICC पुरुषांचा T20  टीम ऑफ द इयर

24 जानेवारी

3. ICC पुरुष वनडे टीम ऑफ द इयर4. ICC महिला वनडे टीम ऑफ द इयर5. ICC पुरुष टेस्ट टीम ऑफ द इयर

25 जानेवारी

6. ICC पुरुष असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर7. ICC महिला असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर8. ICC पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर9. ICC महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर10. ICC इमर्जिंग पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर11. ICC इमर्जिंग महिला क्रिकेटर ऑफ द इयर

26 जानेवारी

12. ICC अंपायर ऑफ द इयर13. ICC पुरुष वन-डे क्रिकेटर ऑफ द इयर14. ICC महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर15. ICC पुरुष टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर16. रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी (ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर)17. सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी (ICC पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयर)18. आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड

सर्वात मोठे दोन पुरस्कार कोणते?

या पुरस्कारांमध्ये सर्वांच्या नजरा ICC पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारावर असतील. या पुरस्काराच्या विजेत्याला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी दिली जाईल. या पुरस्कारासाठी बाबर आझम, बेन स्टोक्स, सिकंदर रझा आणि टीम साऊदी यांना नामांकन मिळाले आहे. त्याचप्रमाणे ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयरची शर्यत नताली शेव्हर, स्मृती मानधना, अमेलिया कार आणि बेथ मुनी यांच्यात आहे. या पुरस्काराच्या विजेत्याला रेचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी दिली जाते.

हे देखील वाचा-