Neeraj Chopra, Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे. गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने जबराट कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. पण फायनल लढतीआधी नीरज चोप्रा याने फेकलेल्या भालाफेकवरुन वाद निर्माण झाला. नीरज चोप्रा याने जेवलिन थ्रो इवेंटमध्ये फेकलेला भाला मोजताच आला नाही. तांत्रिक कारणामुळे नीरजचा थ्रो मोजता आला नाही. त्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी चीनची खिल्ली उडवली. सोशल मीडियावर चीनच्या अधिकारी आणि नियोजनावर टीका केला. नीरज चोप्रा याने फेकलेल्या थ्रोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


पुरुष जेवलिन थ्रो इव्हेंटमध्ये गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने आपला पहिला थ्रो जबराट केला. त्याने जवळपास 86 मीटर थ्रो फेकला. पण तांत्रिक कारणामुळे पहिला अटेम्प्ट रद्द करावा लागला. उपस्थित पंचांनी नीरज चोप्राला पुन्हा प्रयत्न करायला सांगितले. त्यामध्ये नीरज चोप्राला फक्त 82.38 मीटर थ्रो करता आले. त्यानंतर भारतीय चाहत्यांचा राग अनावर आला. चाहत्यांनी सोशल मीडियावर चीन आणि पंचांवर टीका केला. 


असेच काहीसे दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किशोर जेना याच्याबाबत झाले. किशोरने भारतासाठी भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. किशोर याने परफेक्ट भाला फेकला, पण पंचांनी त्याला रेड प्लॅग दाखवला. किशोर जेना आणि नीरज चोप्रा याने याबाबत आवाज उठवला. त्यानंतर पंचांनी थ्रो परफेक्ट असल्याचे मान्य केले. याबाबतही सोशल मीडियावर वाद सुरु झाला.  


























नीरज चोप्राने सुवर्ण तर किशोरने रौप्य, भालाफेकीत भारताची दमदार कामगिरी


भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत गोल्ड मिळवले आहे. भालाफेकीत नीरज चोप्रा याने शानदार कामगिरी केली. नीरज चोप्राशिवाय भारताचा किशोर जेना यानेही दमदार परफॉर्म केला. रौप्य पदक पटकावत किशोर जेना याने पॅरिस ऑलम्पिकमध्ये पात्र झाला आहे.  नीरजने भालाफेकीत पहिल्या प्रयत्नाता 82.38 मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 84.49 मीटर दूर थ्रो केला. चौथ्या प्रयत्नात नीरज याने 88.88 मीटर भाला फेकला.  पाचव्या प्रयत्नात त्याने 80.80 मीटर थ्रो केला. तर जेना याने चौथ्या प्रयत्नात 87.54 मीटर थ्रो केला. किशोर जेना याने रौप्य पदकावर नाव कोरलेय.