ICC Champions Trophy Points Table Team India : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 49.4 षटकांत 228 धावांवर आटोपला. मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, शुभमन गिलच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 46.3 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. टीम इंडियाच्या विजयानंतर चॅम्पियन ट्रॉफीच्या पॉइंट्स टेबल मोठी उलथापालथ झाली आहे.
सामना जिंकल्यानंतरही टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप अ मध्ये यजमान पाकिस्तानसह न्यूझीलंड, भारत आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. पहिल्या दोन दिवशी या गटातील संघांमध्ये सामने खेळवण्यात आले. पहिल्या सामन्यात, पाकिस्तान आणि न्यूझीलंड कराचीतील नॅशनल बँक स्टेडियमवर आमनेसामने आले, ज्यामध्ये यजमान संघाला 60 धावांनी पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात न्यूझीलंडचा नेट रन रेट चांगलाच सुधारला तर पाकिस्तानलाही तेवढाच फटका बसला. दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले पण विजयाचे अंतर न्यूझीलंडच्या विजयापेक्षा चांगले नव्हते. हेच कारण आहे की दोन्ही संघांचे 2-2 गुण असूनही, चांगल्या नेट रन रेटमुळे न्यूझीलंड पुढे आहे.
पाकिस्तान तळाशी!
पाकिस्तान आणि बांगलादेशचे खाते उघडलेले नाही. बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. पराभव असूनही, बांगलादेशी संघाचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे.
या गटातील फक्त 2 संघ पुढील फेरीत पोहोचतील. पहिले सामने गमावल्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या आशा कुठे तरी कमी झाल्या आहेत. तर न्यूझीलंड आणि भारताने एक एक पाऊल पुढे टाकले आहे. आता भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे आहे. भारतीय संघ 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध आणि 2 मार्च रोजी दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. तर बांगलादेशला फक्त पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सामना करावा लागेल.
हे ही वाचा -