Champions Trophy 2025 Prize Money: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आज न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, त्याची भारतासोबत अंतिम सामन्यात लढाई होईल. 






चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 19.5 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळेल. यासोबतच, विजेत्या संघाला एक ट्रॉफी दिली जाईल. उपविजेत्या संघाला सुमारे 9.75 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना सुमारे 4.85 कोटी रुपयांची रक्कम दिली जाईल. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुमारे 60 कोटी रुपयांचा बक्षीसाची रक्कम ठरवण्यात आली आहे. जी 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपेक्षा 53 टक्के जास्त आहे.






कोणाला किती रुपये मिळणार?


विजेता - 19.5 कोटी रुपये
उपविजेता - 9.75 कोटी रुपये
उपांत्य फेरी (पराभूत झालेला संघ) - प्रत्येकी 4.85 कोटी रुपये
पाचवे/सहावे स्थान - 3 कोटी रुपये
7वे/8वे स्थान - 1.2 कोटी रुपये


सामना जिंकणाऱ्या संघांनाही बक्षीस- 


2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, केवळ विजेत्यांनाच नाही तर कोणत्याही संघाने एकही सामना जिंकला तर त्याला भरपूर पैसे मिळणार आहे. आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार, प्रत्येक विजयासाठी संघांना सुमारे 29.5 लाख रुपये मिळतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना 1.08 कोटी रुपये मिळतील. विश्वचषकाप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दर 4 वर्षांच्या अंतराने आयोजित केली जाणार आहे.


विशेष म्हणजे ग्रुप स्टेजमध्ये बाहेर पडणारे संघही रिकाम्या हाताने जाणार नाहीत-


विशेष म्हणजे ग्रुप स्टेजमध्ये बाहेर पडणारे संघही रिकाम्या हाताने जाणार नाहीत. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना 3.5 लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे 3 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना 1 लाख 40 हजार डॉलर्स म्हणजेच 1 कोटी 20 लाख रुपये दिले जातील. याशिवाय, गट टप्प्यातील प्रत्येक विजयासाठी 34 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 30 लाख रुपये दिले जातील. दुसरीकडे, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना $125,000 म्हणजेच अंदाजे 1.08 कोटी रुपये वेगळे दिले जातील.


संबंधित बातमी:


Rohit Sharma Virat Kohli: लहरा दो लहरा दो सरकशी का परचम लहरा दो...; रोहित-विराटच्या मिठीने संपूर्ण भारत भावूक, PHOTO