एक्स्प्लोर

England sacked Test coach Brendon McCullum : आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?

Brendon McCullum to step down as England Test head coach : भारत आणि पाकिस्ताननंतर आता इंग्लंड क्रिकेटमध्येही मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

Brendon McCullum to step down as England Test head coach : भारत आणि पाकिस्ताननंतर आता इंग्लंड क्रिकेटमध्येही मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. इंग्लंड पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याला कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले आहे. मात्र, तो इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम सुरू ठेवणार आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) रविवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.

कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय

ईसीबीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ब्रेंडन मॅक्युलम आता इंग्लंडच्या टेस्ट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहणार नाहीत. हा निर्णय इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार बेन स्टोक्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आणि त्याच्याशी संबंधित वादानंतर घेण्यात आला आहे. मॅक्युलम याने या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने सांगितले की, कसोटी संघासोबत पुढे काम करता येणार नसल्याचे दुःख आहे. मात्र, बोर्डाच्या निर्णयाचा आपण आदर करतो आणि आता संपूर्ण लक्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर असेल.

बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर वाढली चर्चा

बेन स्टोक्सला नाईट क्लबमध्ये झालेल्या वादानंतर मोठा फटका बसला होता. एका रग्बी खेळाडूसोबत झालेल्या वादानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. न्यूजीलंडविरुद्धचा अखेरचा सामना सुरू असतानाच ईसीबीने त्याच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. या घटनेनंतर स्टोक्स आणि मॅक्युलम यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, मॅक्युलम यांनी त्या सर्व अफवा फेटाळून लावत, "माझे आणि स्टोक्सचे संबंध अतिशय चांगले आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही," असे स्पष्ट केले होते.

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये कायम राहणार प्रशिक्षक

कसोटी संघातून पायउतार व्हावे लागले असले, तरी ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील. सध्या इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व हॅरी ब्रूक करत असून, त्याच्यासोबत मॅक्युलमची चांगली समज आणि समन्वय असल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांत इंग्लंडने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने भारताचा 4-0 असा धुव्वा उडवला होता.

इंग्लंड क्रिकेटमध्ये बदलांचे वारे

इंग्लंड क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर आता टेस्ट संघाची धुरा कोण सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेटमध्येही प्रशिक्षकपदावर बदल सुरू असून, बाबर आझम पुन्हा कर्णधार होताच फील्डिंग प्रशिक्षकाने राजीनामा दिल्याची चर्चा आहे. भारतातही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्या यशस्वी जोडीचा कसोटी क्रिकेटमधील प्रवास संपुष्टात आल्याने इंग्लंडच्या लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा -

IND W vs ENG W Lord's Test : लॉर्ड्सवर यास्तिकाचं ऐतिहासिक शतक अन् गोलंदाजांचा कहर! इंग्लंडचा किल्ला ढासळला, भारताच्या विजयाची उलटी गिनती सुरू, आता फक्त 4 पावले दूर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget