एक्स्प्लोर

कर्णधार म्हणून कोहली आणि रहाणेमधील फरक गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी सांगितला!

भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोघांचं नेतृत्त्व कसं भिन्न आहे यावर भाष्य केलं आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. रविचंद्रन अश्विनच्या यू ट्यूब चॅनलवर भरत अरुण म्हणाले की, "अजिंक्य रहाणे एवढा शांत व्यक्ती आहे की, गोलंदाजांना रणनीतीनुसार कामगिरी करण्यास अपयश आलं तरी ते त्याला घाबरत नाहीत. पण नियमित कर्णधार विराट कोहलीच्या एनर्जीला अनेक वेळा त्याचा राग समजला जातो." भरत अरुण यांनी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोघांचं नेतृत्त्व कसं भिन्न आहे यावर भाष्य केलं.

भारताच्या कोणत्याही गोलंदाजाच्या चेंडूवर चौकार गेल्यास रवी शास्त्री माझ्यावर ओरडतात. गोलंदाजाने एकही धाव न देता केवळ विकेट्स घ्याव्यात अशी रवी शास्त्रींची कायम इच्छा असते. एखाद्या गोलंदाजाने सलग दोन चौकार दिले तर ते आरडाओरडा करतात. जर गोलंदाजाने चौकार दिला तर मला समजतं की आता ते माझ्यावर नक्कीच ओरडणार आहे, असं भरत अरुण म्हणाले. "तर अजिंक्य रहाणे शांतचित्त असलेला माणूस आहे. गोलंदाजांना रणनीतीनुसार कामगिरी करण्यास अपयश आलं तरी ते त्याला घाबरत नाहीत, उलट नियमित कर्णधार विराट कोहलीला गोलंदाज घाबरतात, कारण विराट रागावू शकतो हे त्यांना माहित असतं," असं अरुण यांनी सांगितलं.

विराट कोहली पॅटर्निटी लीव्हवर गेल्यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवला. रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनलसोबत बोलताना भरत अरुण म्हणाले की, "अजिंक्यबद्दल बोलायचं झाल्यास तो अतिशय शांत व्यक्ती आहे. रहाणे बाहेरुन मृदू वाटत असला तरी आतून अतिशय कणखर आहे. तो आपल्या खेळाडूंचं समर्थन करतो आणि कायम शांत असतो. गोलंदाजांनी चूक जरी केली तरी ते त्याला घाबरत नाही. कारण गोलंदाजांना माहित असतं कर्णधार आपलीच साथ देणार आहे. परंतु विराट कोहलीच्या बाबतीत उलट आहे. जर तुम्ही वाईट गोलंदाजी केली तर कोहली रागावू शकतो असं वाटू शकतं. पण ही त्याच्यातील एनर्जी अर्थात ऊर्जा असते."

महत्त्वाच्या बातम्या

England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
Ajinkya Rahane Retirement : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Embed widget