Ben Stokes Ruled Out : कॅप्टन बेन स्टोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर, इंग्लंडला सर्वात मोठा धक्का, कारण समोर
Ben Stokes : भारताविरुद्ध पाचव्या कसोटीत इंग्लंडच्या संघात चार बदल करण्यात आले आहेत. कॅप्टन बेन स्टोक्स दुखापतीमुळं बाहेर गेला आहे.

Ben Stokes Ruled Out : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरची कसोटी उद्यापासून सुरु होणार आहे. ओव्हलच्या मैदानावर पाचवी कसोटी खेळवली जाईल. या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स ओव्हल कसोटीतून बाहेर गेला आहे. उजव्या खांद्याला दुखापत झाल्यानं बेन स्टोक्स संघाबाहेर गेला आहे. इंग्लंडनं पाचव्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. पाचव्या कसोटीत संघात चार बदल करण्यात आले आहेत. बेन स्टोक्स बाहेर गेल्यानं संघाचं कर्णधार पद आता ओली पोपकडे देण्यात आलं आहे.
इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. भारतासाठी पाचवी कसोटी महत्त्वाची आहे. इंग्लंडनं नेहमीप्रमाणे कसोटीसाठीचा संघ लवकर जाहीर केला त्याप्रमाणं संघात चार बदल करण्यात आले आहेत. कॅप्टन बेन स्टोक्स दुखापतीमुळं संघाबाहेर गेला आहे. बेन स्टोक्स सह डॉसन, जोफ्रा आर्चर आणि कार्स यांच्या ऐवजी इतरांना पाचव्या कसोटीत स्थान देण्यात आलं आहे.
बेन स्टोक्स पाचवी कसोटी खेळणार नसल्यानं आता नेतृत्त्व ओली पोप करणार आहे. इंग्लंडनं पाचव्या कसोटीसाठी संघात चार बदल केले आहेत. बेन स्टोक्स दुखापतीमुळं बाहेर गेला. तर डॉसन, आर्चर आणि कार्स यांना डच्चू देण्यात आला आहे. डॉसन याला बशीर दुखापतग्रस्त झाल्यानं संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, तो चौथ्या कसोटीत चांगली कामगिरी करु शकला नाही.
मँचेस्टर कसोटीत भारताच्या पहिल्या डावात पाच विकेट घेणारा आणि शतक झळकवणारा बेन स्टोक्स संघाबाहेर जाणं इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मँचेस्टर कसोटीत बेन स्टोक्सला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाल्यानं फलंदाजी करताना रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर जावं लागलं होतं. त्यानं पुन्हा फलंदाजीला येत शतक केलं होतं.
पाचव्या कसोटीत भारताविरुद्ध इंग्लंडकडून चार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये जेकब बेथेल, जेमी ओवर्टन,एटकिन्सन, जोश टंग या चार जणांचा त्यात समावेश आहे. सध्या इंग्लंड मालिकेत 2-1 नं आघाडीवर आहेत. आघाडी कायम ठेवण्यासाठी पाचवी कसोटी अनिर्णित राहिली तरी इंग्लंड साठी फायदेशीर ठरु शकतं. इंग्लंडनं विजय मिळवल्यास त्यांची आघाडी 3-1 अशी होईल. इंग्लंडला याचा फायदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत होऊ शकतो.
इंग्लंडचा पाचव्या कसोटीसाठी संघ :
झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप (कॅप्टन), जो रुट, हॅरी ब्रुक, जेकब बेथेल, ख्रिस वोक्स,गस एटकिन्सन, जेमी ओवर्टन, जोश टंग



















