CSK Practice :आयपीएल (IPL 2022) 2022 साठी  चेन्नई सुपर किंग्सने सराव सुरु केला आहे. सध्या संघ सूरतमध्ये असून त्याठिकाणी ट्रेनिंग कॅम्प लावण्यात आला आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना हा सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) यांच्यात असून या सामन्याला काही दिवसंच शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी वानखेडे मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान सीएसकेचा कॅम्प सूरतमध्ये लागला असून कर्णधार एमएस धोनीला पाहण्यासाठी धोनी फॅन्सनी चक्क रस्त्यावर गर्दी केली आहे.

रविवारी चेन्नई सुपर किंग्सच्या सूरतमधील कॅम्पचा पहिला दिवस होता. यावेळी कर्णधार धोनीसह इतर खेळाडू सराव करत असून त्यांना पाहण्यासाठी अनेक जणांनी रस्त्यावर गर्दी केली आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या इन्स्टाग्रामवर याबाबतचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. 

आयपीएल 2022 मधील सीएसकेचं वेळापत्रक

सामनाकधीकुठेकुणाबरोबर
पहिला 26 मार्चवानखेडे स्टेडियम, मुंबईकोलकाता नाईट रायडर्स
दुसरा31 मार्च ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईलखनौ सुपरजायंट्स
तिसरा3 एप्रिलब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईपंजाब किंग्स
चौथा9 एप्रिलडी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईसनरायजर्स हैदराबाद
पाचवा12 एप्रिलडी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईआरसीबी
सहावा17 एप्रिलएमसीए स्टेडियम, पुणेगुजरात टायटन्स
सातवा21 एप्रिलडी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईमुंबई इंडियन्स
आठवा25 एप्रिलवानखेडे स्टेडियम, मुंबईपंजाब किंग्स
नववा1 मेएमसीए स्टेडियम, पुणेसनरायजर्स हैदराबाद
दहावा4 मेएमसीए स्टेडियम, पुणेआरसीबी
अकरावा8 मेडी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईदिल्ली कॅपिटल्स
बारावा12 मेवानखेडे स्टेडियम, मुंबईमुंबई इंडियन्स
तेरावा15 मेवानखेडे स्टेडियम, मुंबईगुजरात टायटन्स
चौदावा20 मेब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईराजस्थान रॉयल्स

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha