Women's IPL: दिर्घकाळापासून बहुप्रतिक्षीत असलेल्या महिला आयपीएलबाबत (Women Indian Premier League) महत्वाची माहिती समोर आलीय. आगामी महिला टी-20 विश्वचषकानंतर बीसीसीआय महिला आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी बीसीसीआयनं खास प्लॅन तयार केलाय. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात बीसीसीआय महिला आयपीएल आयोजित करण्याच्या विचारात आहे. म्हणजेच, 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या महिल्या टी-20 विश्वचषकानंतर आणि पुरूषांच्या आयपीएलअगोदर महिला आयपीएल स्पर्धा पार पडण्याची शक्यता आहे.
ट्वीट-
बीसीसीआयचा खास प्लॅन
बीसीसीआयच्या सध्याच्या प्लॅननुसार, महिला आयपीएलचा पहिला हंगामा फक्त ठिकाणी पार पडणार आहे. फक्त पाच संघ या लीगमध्ये सहभाग दर्शवतील. पुरुषांच्या आयपीएलच्या तुलनेत या लीगमधील एका संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. या पाच परदेशी खेळाडूंपैकी चार खेळाडू आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांमधील असतील. तर, 5 वा खेळाडू असोसिएट्स देशाचा असू शकतो. प्रत्येक संघात जास्तीत जास्त 18 खेळाडू सहभागी होतील. ज्यात जास्तीत जास्त 6 परदेशी खेळाडू असतील.
महिला आयपीएल लीगच्या संघाची नावं कशी असतील?
क्रिकेट वेबसाईट क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार, बोर्डानं अद्याप महिला आयपीएल संघ शहरांच्या नावावर किंवा झोनच्या नावावर विकण्याचा निर्णय घेतलेला नाही. संघ क्षेत्रानुसार विकले गेल्यास ते उत्तर (जम्मू/धर्मशाला), दक्षिण (कोची/विशाखापट्टणम), मध्य (इंदूर/नागपूर/रायपूर), पूर्व (रांची/कटक), उत्तर पूर्व (गुवाहाटी) आणि पश्चिम (पुणे/राजकोट) असं असण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी पुरूष आयपीएलचे सामने खेळले जात नाहीत, अशा ठिकाणीच महिला आयपीएल लीगमधील सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं.
या पद्धतीन सामने खेळवले जातील
बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. महिला आयपीएल लीगच्या गट सामन्यात संघ दोनदा एकमेकांसमोर येतील. या लीगमधील अव्वल संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असेलल्या संघाला संघाला एलिमिनेटर सामने खेळून अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळेल.
हे देखील वाचा-