नवी दिल्ली: टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या (Team India Coach) निवडीसाठी बीसीसीआयनं (BCCI) अर्ज मागवले होते. विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ जून महिन्यात संपणार आहे. बीसीसीआयनं त्यापूर्वी प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 27 मे होती. बीसीसीआयकडे प्रशिक्षक पदासाठी तब्बल 3 हजार अर्ज आले आहेत. या अर्जांमध्ये बोगस नावांनी अर्ज दाखल करण्यात आल्याचं उघड झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी या नावांचा वापर करत काही जणांनी बोगस अर्ज केले आहेत. 


बीसीसीआयनं प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी 27 मे ही अंतिम तारीख निश्चित केलीहोती. बीसीसीआयनं गुगल फॉर्मद्वारे ही माहिती मागवली होती. बीसीसीआयकडे आलेल्या अर्जांमध्ये राजकीय नेत्यांच्या आणि क्रिकेटपटूंच्या नावानं बोगस अर्ज आले आहेत. राजकीय नेत्यांच्या आणि क्रिकेटपटूंच्या नावानं एकाहून अधिक अर्ज आले असल्यानं ते बोगस अर्ज असल्याचं समोर आलं आहे. या बाबत द इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिलं आहे. 


बीसीसीआयकडे सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग यासह अनेक माजी क्रिकेटपटूंच्या नावे अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय नरेंद्र  मोदी आणि अमित शाह या नावानं देखील अर्ज बीसीसीआयकडे अर्ज आले आहेत.बीसीसीआयनं प्रशिक्षक पदासाठी 13 मे रोजी गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवले होते.  


बीसीसीआयकडे बोगस अर्ज दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये बीसीसीआयनं प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते त्यावेळी 5 हजार अर्ज आले होते. त्यामध्ये सेलिब्रेटींच्या नावानं अर्ज आले होते. बीसीसीआयनं त्यानंतर इच्छुकांना मेलद्वारे अर्ज करण्यास सांगितलं होतं. 


राहुल द्रविड टी-20 वर्ल्ड कपनंतर पदावरुन दूर होणार असल्यानं बीसीसीआयनं प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. बीसीसीआयनं नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ 2027 च्या वनडे वर्ल्ड कप पर्यंत निश्चित केला आहे. बीसीसीआयनं राहुल द्रविडला आणखी काही कालावधीसाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानं प्रशिक्षक म्हणून वाढीव कालावधीमध्ये काम करण्यास नकार दिला. त्यामुळं नव्या प्रशिक्षकाचा शोध सरु करण्यात आला आहे. 


गौतम गंभीर, स्टीफन फ्लेमिंग यांचं नाव चर्चेत


टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीर आणि स्टीफन फ्लेमिंगचं नाव चर्चेत होतं. गौतम गंभीरनं यंदाच्या आयपीएलपासून केकेआरचा मेंटॉर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळं शाहरुख खानची साथ सोडून टीम इंडियाचं प्रशिक्षक पद स्वीकारेल का हे पाहावं लागेल. तर, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याचं देखील नाव चर्चेत होतं. आता बीसीसीआयकडे प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. टीम इंडियाला नवा कोणता प्रशिक्षक मिळतो याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.


संबंधित बातम्या : 


Shreyas Iyer : केकेआरला आयपीएलचं विजेतेपद , आता श्रेयस अय्यर शुभमन गिल अगोदर टीम इंडियाचा कॅप्टन होणार, माजी खेळाडूचा दावा


IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर