चेन्नई :श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्त्वातील कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) आयपीएलचं विजेतेपद मिळवलं.  केकेआरनं अंतिम फेरीच्या लढतीत पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वातील सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं. केकेआरनं हैदराबादवर 8 विकेटनं दणदणीत विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यंदाच्या आयपीएलमधील यशस्वी कॅप्टन ठरला. श्रेयस अय्यरनं मिळवलेल्या यशाचं कौतुक करताना भारताच्या माजी क्रिकेटपटूनं मोठं वक्तव्य केलं आहे. रॉबिन उथप्पानं (Robin Uthappa) श्रेयस अय्यर टीम इंडियाचा पुढील कॅप्टन असू शकतो असं म्हटलं.  


केकेआरनं दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व करत असताना त्यांना 2020 च्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीच्या लढतीत पोहोचवलं होतं. श्रेयस अय्यर 2022 पासून केकेआरचं नेतृत्त्व करत आहे. 2023 च्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर दुखापतीमुळं आयपीएलबाहेर होता. केकेआरचं नेतृत्त्व त्यावेळी नितीश राणानं केलं होतं. मात्र, 2024 च्या आयपीएलमध्ये केकेआरचं नेतृत्त्व पुन्हा एकदा श्रेयस अय्यरकडे आलं. यावेळी श्रेयस अय्यरनं केकेआरला विजेतेपद मिळवून दिलं. 


रॉबिन उथप्पा काय म्हणाला?


उथप्पानं 'जियोसिनेमा' शी बोलताना म्हटलं की, मी आता बोलणार आहे की आगामी काळात श्रेयस अय्यर टीम इंडियाचा कॅप्टन असेल. मला वाटतं कॅप्टन पदाच्या शर्यतीत श्रेयस अय्यर आहे, शुभमन गिल कॅप्टन होण्यापूर्वी श्रेयस भारताचा कॅप्टन होऊ शकतो.  श्रेयसकडे टीम सांभाळण्याची पद्धत आणि कौशल्य आहे, असं रॉबिन उथप्पानं म्हटलं. श्रेयस अय्यरनं पुढं म्हटलं की त्यानं या आयपीएलमध्ये खूप गोष्टी शिकल्या असतील. गौतम गंभीर, चंद्रकांत पंडित आणि अभिषेक नायर या दिग्गजांसोबत तो काम करत होता. 


रॉबिन उथप्पानं यानंतर केंद्रीय करार ते दुखापत यासह विविध गोष्टींबदद्ल भाष्य केलं. आयपीएलपूर्वी श्रेयस अय्यरला टीम इंडियाच्या केंद्रीय करारतून वगळण्यात आलं. श्रेयस अय्यरनं रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार दिला होता, त्यामुळं बीसीसीआयनं ती कारवाई केली होती.  



उथप्पानं म्हटलं की, अनेक गोष्टी सहन केल्यानंतर, पाठदुखी, वर्ल्ड कपमधून बाहेर होण, केंद्रीय करारातून बाहेर होणं,श्रेयस अय्यर सोबत काय काय घडलं, त्याच्या बाबत अनेक चर्चा करण्यात आल्या, असं उथप्पानं श्रेयस अय्यर बाबत म्हटलं.   


दरम्यान, श्रेयस अय्यरनं 2023 मध्ये भारतात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती.  सध्या वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होत असलेल्या टी-20  वर्ल्ड  कप स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यरला संधी मिळालेली नाही. आगामी मालिकांमध्ये श्रेयसला संधी मिळणार का हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या : 


Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक


IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर